क्राईम

क्राईम
Published on

सार्वजनिक ठिकाणी मद्य
पिणाऱ्यांवर गुन्हा

रत्नागिरी ः शहरातील सार्वजनिक ठिकाणी मद्य पिणाऱ्या तरुणाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकिब जिकीरीया वस्ता असे संशयिताचे नाव आहे. ही घटना गुरूवारी (ता. २८) सायंकाळी खेडेकरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर निदर्शनास आली. या प्रकरणी पोलिस हवालदार आशिष भालेकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
---------
माहेर संस्थेतील
वृद्धेचा मृत्यू

रत्नागिरी ः निवळी येथील माहेर संस्थेतील वृद्ध महिलेची तब्येत बिघडल्याने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चंदा विश्वनाथ पाटील (वय ७५, रा. निवळी माहेर संस्था, रत्नागिरी) असे मृत वृद्ध महिलेचे नाव आहे. ही घटना गुरूवारी (ता. २८) सकाळी घडली.
---
रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू

रत्नागिरी ः रेल्वे कर्मचाऱ्याला अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. विलास भागूराम जाधव (वय ५१, रा. श्रीगणेशा अपार्टमेंट- पाडावेवाडी, मिरजोळे, रत्नागिरी) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २९) सकाळी पावणेआठच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास विलास जाधव यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना तपासून मृत घोषित केले.
-----
रेल्वे प्रवासी
महिलेचा मृत्यू

रत्नागिरी ः राजापूर रेल्वेस्टेशनला रेल्वेत चढलेल्या महिलेला चक्कर आली. रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथून तिला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. सुनीता बाबू राणे (वय ४८, रा. शेगळेवाडी- विलये, ता. राजापूर) ही घटना गुरूवारी (ता. २८) सकाळी राजापूर स्टेशन येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुनीता राणे या सकाळी रेल्वेतून येत असताना राजापूर रेल्वस्टेशन दरम्यान त्यांना चक्कर आली. नातेवाईकांनी त्यांना रत्नागिरी रेल्वेस्टेशनला उतरवून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.
------
रेल्वे ट्रॅकजवळ
आढळला मृतदेह

चिपळण : चिपळूण येथील रेल्वेट्रॅकजवळ साईमंदिरच्या बाजूला वालोपे येथे अज्ञात तरुणाचा मृतदेह रेल्वे कर्मचाऱ्यांना आढळून आला. या प्रकरणी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. ही घटना मंगळवारी (ता. २६) दुपारी दोनच्या सुमारास वालोपे येथे निदर्शनास आली. या मृत तरुणाचे अंदाजे वय ४० आहे. तरुणाला कामथे उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केला होता. तेथील डॉक्टरांनी तपासून तो मयत झाल्याचे घोषित केले. चिपळूण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.
-----
भडगाव-खोंडेतील
तरुणाचा मृत्यू

खेड : तालुक्यातील भडगाव-खोंडे कातवाडी येथील तरुणाचा बुधवारी (ता. २७) आकस्मिक मृत्यू झाला. मिलिंद बाळा मांडवकर असे मृत तरुणाचे नाव आहे. तरुणाचा आवाज बंद होऊन त्याला घरघर लागली. त्यांना उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com