

रत्नागिरी एसटी विभाग उत्पन्नात तिसरा
राज्यात यशस्वी वाटचाल ; एक कोटी १० लाखांचे उद्दिष्ट
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २० : राज्य परिवहन महामंडळातर्फे प्रवाशांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेमुळे ‘लालपरी’ सुसाट धावत आहे. उत्पन्नाचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करीत रत्नागिरी विभागाने राज्यात तिसरा क्रमांक मिळवला आहे.
एसटी विभागाने १ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर या कालावधीत प्रति दिन रत्नागिरी विभागाला १ कोटी १० लाख ७७ हजारांचे उद्दिष्ट होते. विभागाने १ कोटी ११ लाख ३८ हजार रुपये उत्पन्न प्राप्त करत १००. ५५ टक्के उद्दिष्ट प्राप्त केले. त्यामुळे रत्नागिरी एसटी विभागाने राज्यात तिसरा क्रमांक मिळविला आहे. प्रथम क्रमांकावर परभणी विभाग, तर द्वितीय क्रमांकावर लातूर विभाग आहे. चौथा क्रमांक अमरावती विभागाने मिळविला आहे.
शासनाने महिलांना एसटीतून निम्म्या तिकीट दरात प्रवास करण्याची सवलत दिली. ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठीही निम्म्या तिकीट दरात प्रवासाची सवलत असून, ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरीकांसाठी मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध आहे. या योजनांचा एसटीला चांगला फायदा झाला असून, प्रवासी भारमानात भरघोस वाढ झाली आहे. रत्नागिरी विभागानेही सुटीच्या कालावधीत प्रवाशांची गर्दी पाहून गर्दीच्या मार्गावरील फेऱ्या वाढविल्या होत्या. मुंबई, पुणे मार्गावरील जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. एकूणच योग्य नियोजनामुळे एसटीला चांगलाच फायदा झाला आहे.
----
जिल्ह्याचे चित्र
*आगार* उद्दिष्ट* पूर्तता* टक्केवारी
• परभणी* ८५.४९* ८६.५१* १०१.२०
• लातूर* १११.७९* ११२.४४* १००.५७
• रत्नागिरी* ११०.७७* १११.३८* १००.५५
• अमरावती* ६६.१३* ६६.१६* १००.०५
---
कोट...
प्रवाशांची गर्दी पाहून त्या-त्या मार्गावर फेऱ्यांची संख्या वाढविण्यात आली होती. विभागातील सर्व चालक-वाहक, कर्मचारी, अधिकारी यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे उद्दिष्टपूर्ती करण्यात यश आले आहे.
- प्रज्ञेश बोरसे, विभागनियंत्रक, रत्नागिरी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.