काशीराम राऊळ यांचे निधन

काशीराम राऊळ यांचे निधन
Published on

28409
काशीराम राऊळ यांचे निधन
सावंतवाडी, ता. २९ ः नेमळे येथील आंबा बागायतदार तसेच नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे कार्यकारी मंडळ सदस्य काशीराम परशुराम उर्फ के. पी. राऊळ (वय ८५, रा. फौजदारवाडी, नेमळे) यांचे गुरुवारी (ता.२८) राहत्या घरी निधन झाले.
श्री. राऊळ यांनी आपल्या जीवन प्रवासात एसटी महामंडळात वाहक, नेमळे विकास सेवा सोसायटी चेअरमन, नेमळे कौल उत्पादक संस्थेचे संचालक तसेच नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणी मंडळ सदस्य अशी पदे भूषवली होती. सहकार, शिक्षण, समाजकारण, राजकारण अशा विविध क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते. प्रगतशील शेतकरी व आंबा बागायतदार म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, तीन मुली, जावई, एक पुतण्या, नातू, नातवंडे असा परिवार आहे. नेमळे गावातील आंबा बागायतदार परशुराम उर्फ बाळा राऊळ, लीलाधर राऊळ यांचे ते वडील होत.
--------------------
28410
मोहन मडगावकर यांचे निधन
सावंतवाडी, ता. २९ ः तालुक्यातील सावरवाड येथील रहिवासी मोहन रामचंद्र मडगावकर (वय ७०) यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर यांचे निकटचे सहकारी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com