

28431
जिल्हा पत्रकार संघाची
नूतन कार्यकारिणी जाहीर
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २९ ः जिल्हा पत्रकार संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नूतन जिल्हा कार्यकारिणीची बिनविरोध निवड झाली. अध्यक्षपदी उमेश तोरसकर तर सचिवपदी बाळ खडपकर यांची निवड झाली तर परिषद प्रतिनिधी म्हणून गेणेश जेठे यांची नियुक्ती करण्यात आली.
जिल्हा पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवनात झाली. या सभेत नूतन जिल्हा कार्यकारिणीची निवड बिनविरोध करण्यात आली. या निवडणुकीचे निवडणूक अधिकारी म्हणून मराठी पत्रकार परिषदेचे सदस्य गणेश जेठे यांनी काम पाहिले. त्यांच्या नेटक्या नियोजनामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली.
नविन कार्यकारिणी अशी ः अध्यक्ष उमेश तोरसकर, सचिव बाळ खडपकर, उपाध्यक्ष आनंद लोके, बंटी उर्फ विद्याधर केनवडेकर, संतोष राऊळ, किशोर जैतापकर, खजिनदार संतोष सावंत, महेश सरनाईक (एक एक वर्ष विभागून), सहसचिव प्रवीण मांजरेकर. कार्यकारणी सदस्य ः राजन नाईक (कुडाळ), लवू म्हाडेश्वर (सिंधुदुर्गनगरी), लक्ष्मीकांत भावे (कणकवली), अमित खोत (मालवण), प्रशांत वाडेकर (देवगड), महेंद्र मातोंडकर (वेंगुर्ले), सुहास देसाई (दोडामार्ग) आणि निमंत्रित सदस्य देवयानी वरसकर (सिंधुदुर्गनगरी). यावेळी अजित सावंत, भगवान लोके, प्रकाश काळे, महेश सरनाईक, रमेश जोगळे, नंदकिशोर महाजन, हेमंत कुलकर्णी, संतोष वायंगणकर, गजानन नाईक, संतोष कुळकर्णी, माधव कदम, राजू तावडे, अयोध्या प्रसाद गावकर, अण्णा केसरकर, संदीप देसाई, राजू मुंबरकर, काका करंबेळकर, लवू खरवत, एकनाथ पवार, हरिश्चंद्र पवार, दाजी नाईक, मंगल कामत, विजय देसाई, संदीप गावडे, प्रमोद ठाकूर, रवी गावडे, संतोष गावडे, प्रमोद म्हाडगुत आदी पत्रकार उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला पत्रकारांच्या दिवंगत नातेवाइकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. समाजात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांचा अभिनंदनाचा ठराव घेतला. या सभेत वार्षिक जमा खर्च तसेच इतिवृत्ताला मंजुरी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.