पान एक-सिंधुदुर्ग पर्यटनसाठी 47 कोटी

पान एक-सिंधुदुर्ग पर्यटनसाठी 47 कोटी
Published on

टीपः swt2923.jpg, swt2924.jpg व swt2925.jpg,मध्ये फोटो आहे.
ओळ - सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील समुद्राखालील विश्व. (संग्रहित)
टीपः swt2926.jpg मध्ये फोटो आहे.
ओळ - पाणबुडी (संग्रहित)

सिंधुदुर्ग पर्यटनासाठी ४७ कोटी
केंद्राकडून निधी; अंडर वॉटर म्युझियमसाठी तरतूद

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २९ ः सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी पर्यटनाला नवी दिशा देणारा निर्णय केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने आज घेतला. जिल्ह्यात पाणबुडीबरोबरच समुद्राखालील संग्रहालय, कृत्रिम मासेमारी प्रवाळ याचाही पर्यटन विकास साधला जाणार आहे. यासाठी तब्बल ४६.९१ कोटींचा निधी देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘एक्स’च्या माध्यमातून केली.
देशभरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने दोन महिन्यांपूर्वी २३ राज्यांकडून प्रस्ताव मागविले होते. एकूण प्राप्त प्रस्तावांपैकी २३ राज्यांमधील ४० प्रकल्पांना विशेष साहाय्य योजनेंतर्गत मान्यता देण्यात आली आहे. प्रकल्पांची एकूण किंमत ३,२९५ कोटी रुपये आहे. राज्यात नाशिक शहर व सिंधुदुर्ग या दोन शहरांचा प्रकल्पामध्ये समावेश करण्यात आला आहे. सिंधुदुर्गसाठी ४६.९१ कोटी रुपये, तर नाशिकसाठी ९९.१४ कोटी रुपये अर्थसाहाय्य मंजूर केले.
सिंधुदुर्ग हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा आहे. येथे गेल्या काही वर्षांत पर्यटन विकासाचा वेग वाढला आहे. मात्र, हे पर्यटन विशेषतः किनारपट्टी भागात झुकल्याचे चित्र आहे. असे असले तरी पर्यटन विकासाच्या दृष्टीने जिल्ह्यात अनेक संधी आहेत. यात निसर्ग पर्यटन, धार्मिक पर्यटन आदींचा समावेश आहे. याच्याच जोडीने येथे पर्यटन वाढीच्या वेगासाठी वेगळे उपक्रम, प्रकल्प गरजेचे आहेत. गेल्या काही वर्षांत किनाऱ्यापर्यंत थांबणारे पर्यटन आता किनाऱ्यापासून सुरू होऊन समुद्राकडे विस्तारत आहेत. स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग आदींचा यात समावेश आहे. यालाच जोडून केंद्राने सागरी पर्यटनाला नवी दिशा देण्यासाठी ४६.९१ कोटी रुपये मंजूर केले आहेत. या निधीतून जिल्ह्यात पाणबुडीबरोबरच समुद्राखालील संग्रहालय, कृत्रिम मासेमारी प्रवाळ याचाही पर्यटन विकास साधला जाणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समुद्रात समुद्री पर्यटन विकासासाठी पाणबुडी प्रकल्प मंजूर करण्यात आला होता. मात्र, चार-पाच वर्षांत याबाबत कोणतीच कार्यवाही झाली नव्हती. प्रकल्प होण्यासाठी हालचाली झाल्या नव्हत्या. हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचा आरोप झाला होता. यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात टीका-टिप्पणी करून राजकीय रंग देण्यात आला होता. मात्र, केंद्र सरकारने ४६.९१ कोटी रुपये मंजूर करून हा प्रकल्प जिल्ह्यातच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
--------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com