येथे सोळजाई देवीची लोटांगण यात्रा उत्साहात

येथे सोळजाई देवीची लोटांगण यात्रा उत्साहात
Published on

rat३p६.jpg -
P२४N२९००९
देवरूख ः येथील ग्रामदेवता सोळजाई देवीच्या लोटांगण यात्रेत सहभागी भक्त.

सोळजाई देवीची लोटांगण यात्रा उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
देवरूख, ता. ३ ः संगमेश्वर तालुक्यातील देवरूखची ग्रामदेवता व तब्बल ४४ खेड्यांची मालकीण असलेल्या सोळजाई देवीचा प्रसिद्ध देवदिवाळी व लोटांगण यात्रा कार्यक्रम आज उत्साहात संपन्न झाला. नवसाला पावणारी व भक्तांच्या हाकेला धावणारी अशी सोळजाई देवीची ख्याती आहे. देवदिवाळीला आज सोळजाईच्या प्रसिद्ध लोटांगण यात्रेला दुपारी ३.३०ला प्रारंभ झाला. सोळजाई देवीचे मानकरी, पुजारी, ट्रस्टी व हजारो भाविकांच्या उपस्थितीत लोटांगण यात्रेला मोठ्या उत्साहात सुरवात झाली. यावर्षी २३ जणांनी लोटांगणे घालत नवस फेडले. लोटांगण यात्रेला भाविकांची मोठी गर्दी झाली असून, भाविक यात्रेचा आनंदही लुटत आहेत. ही यात्रा सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com