‘मानविहक्क’च्या जिल्हाध्यक्षपदी प्रा.हरिभाऊ भिसे यांची निवड

‘मानविहक्क’च्या जिल्हाध्यक्षपदी प्रा.हरिभाऊ भिसे यांची निवड
Published on

29012

‘मानविहक्क’च्या जिल्हाध्यक्षपदी
प्रा.हरिभाऊ भिसे यांची निवड

कणकवली,ता. ३ ः आतंराष्ट्रीय मानविहक्क संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी प्रा. हरिभाऊ भिसे यांची निवड करण्यात आली. येथे झालेल्या बैठकीत या संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. या बैठकीला देवगड, कणकवली, मालवण, सावंतवाडी, दोडामार्ग या भागांतील प्रमुख पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
यावेळी प्रा. हरिभाऊ भिसे यांनी स्वागत केले. कार्याविषयी व बैठकीतील ध्येय धोरणे, समाजोपयोगी विविध उपक्रमांविषयी निवृत्त पोलिस अधिकारी विजय कदम, दयानंद मांगले, देवगड तालुका अध्यक्ष श्याम कदम यांनी विचार मांडले. बुलंद पटेल, सूर्यकांत शृंगारे, प्राचार्य डॉ.सुभाष सावंत यांनी चर्चेत सहभाग घेऊन महत्वपूर्ण सूचना आणि पुढील योग्य कार्यवाहीबाबत मार्गदर्शन केले.
बैठकीच्या निमित्ताने जिल्हा अध्यक्ष हरीभाऊ भिसे यांनी मार्गदर्शन करून संघटनेचे पुढील कार्याविषयी रूपरेषेबाबत उहापोह केला. जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांची घोषणा जिल्हाध्यक्ष हरिभाऊ भिसे यांनी केली. यात कार्याध्यक्षपदी सुनील मेस्त्री, उपाध्यक्ष दयानंद तेली, बुलंद पटेल, प्राचार्य डॉ. सुभाष सावंत, सूर्यकांत शृंगारे, प्रभारी जिल्हा सरचिटणीस शरयु ठुकरुल, पोलिस संरक्षण विभाग जिल्हाप्रमुख विजय कदम, मीडिया जिल्हाध्यक्ष दयानंद मांगले, सदस्य राजन भोसले, प्राध्यापक महादेव माने, आनंद देवगडकर, रंजन चव्हाण, महिला जिल्हाध्यक्ष सुरेखा भिसे, जिल्हा महिला कार्याध्यक्ष श्रीमती मेस्त्री, जिल्हा महिला सरचिटणीस दीक्षा तेली, सदस्य रीमा भोसले, स्नेहल मेस्त्री, युगंधरा सावंत यांची निवड करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com