

भैरी व्याघ्रांबरी मंदिरात देवदिवाळी उत्सव
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. ३ : येथील ग्रामदेवता श्री भैरी व्याघ्रांबरी देवस्थानचा देवदिवाळी उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. या निमित्त देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पहाटे काकड आरती, अभिषेक व पूजा, देवांना रूपे लावण्याचा कार्यक्रम तसेच भाविकांसाठी देवदर्शन, रात्री ठीक १० वाजेपर्यंत गावातील भजनांचा कार्यक्रम, श्री वाघजाई जाखडी नृत्य मंडळ, आगवे-हुमणेवाडी शक्तीवाले शाहीर संदिप हुमणे प्रस्तूत कोकणची लोककला जाखडी नृत्य पार पडले. या निमित्त संपूर्ण मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. कार्यक्रम यशस्वी करण्याठी श्री भैरी व्याघ्रांबरी देवस्थानचे अध्यक्ष शरद शेटे, सचिव अरूण गुरव, खजिनदार मुरलीधर बागकर व सर्व देवस्थान कमिटी सदस्यांनी मेहनत घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.