

29054
वाचन स्पर्धेत मैथिली, खुशी प्रथम
बांद्यातील स्पर्धा ः कोकण विकास संस्थेचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ३ ः कोकण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल पुरस्कृत येथील नट वाचनालयात आयोजित शालेय प्रकट वाचन स्पर्धेत लहान गटात नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुलीच्या मैथिली सावंत हिने तर मोठ्या गटात राजा शिवाजी विद्यालय, विलवडेच्या खुशी परब हिने प्रथम क्रमांक मिळविला. दोन्ही गटात स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ही स्पर्धा वाचनालयाच्या नाडकर्णी सभागृहात झाली.
पाचवी ते सातवी या लहान गटात दिव्यल गावडे (जिल्हा परिषद इन्सुली शाळा नं. ४), किंजल सावंत (जिल्हा परिषद शाळा, असनिये) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. या गटात दिव्या पोकळे (जिल्हा परिषद शाळा, असनिये) व मानस दळवी (जिल्हा परिषद शाळा, विलवडे) यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. आठवी ते दहावी या मोठ्या गटात साक्षी गवस (राजा शिवाजी विद्यालय, विलवडे), रितीशा देसाई (माध्यमिक विद्यालय, डेगवे) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविले. आरती कोठावळे (नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली) व वेदिका देसाई (माध्यमिक विद्यालय, डेगवे) यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. सर्व विजेत्यांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण महाबळेश्वर सामंत व सुनील नातू यांनी केले.
स्पर्धेचे उद्घाटन वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर वाचनालयाचे उपाध्यक्ष नीलेश मोरजकर, कोकण विकास संस्थेच्या प्रकल्प व्यवस्थापक श्रुती तारी, वाचनालयचे सचिव राकेश केसरकर, सहसचिव हेमंत मोर्ये, संचालक प्रकाश पाणदरे, शंकर नार्वेकर, अनंत भाटे, ग्रंथपाल सुस्मिता नाईक आदी उपस्थित होते. यावेळी शिक्षक, पालक, विद्यार्थी तसेच नियमित वाचक उपस्थित होते. राकेश केसरकर यांनी सूत्रसंचालन केले. हेमंत मोर्ये यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.