

29061
ओरोसचे उपसरपंच मालवणकरांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ३ ः भाजपची सत्ता असलेल्या ओरोस बुद्रुक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पांडुरंग ऊर्फ अमोल मालवणकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच आशा मुरमुरे व माजी पंचायत समिती सदस्या सुप्रिया वालावलकर यांनी मालवणकर यांचे अभिनंदन केले.
माजी उपसरपंच महादेव ऊर्फ गौरव घाडीगावकर यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी तहसीलदार कार्यालयाकडून निवडणूक घेण्यात आली. सरपंच मुरमुरे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक पार पडली. त्यामध्ये गेली अनेक वर्षे सामाजिक कार्य करणारे ग्रामपंचायत सदस्य मालवणकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. ओरोस ग्रामपंचायत कार्यालयामध्ये झालेल्या या निवडीच्या वेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, दादा साईल, देवेंद्र सामंत, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश देसाई, गौरी योंद्रे, राजश्री नाईक, तेजश्री राऊळ, भक्ती पळसमकर, पूजा मालवणकर, प्रिया आजगावकर, श्रीमका सावंत, रसिका बंजारे, ग्रामविकास अधिकारी सरिता धामापूरकर, मदन परब, सुहास परब, महादेव परब, सिद्धेश परब, वनिता जुवेकर, सौ. कोचरेकर, डॉ. सावंत, श्री. केळूसकर आदी उपस्थित होते. सर्वांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.