-लाभार्थ्यांसाठीच्या योजनांची पडताळणी करा

-लाभार्थ्यांसाठीच्या योजनांची पडताळणी करा
Published on

लाभार्थ्यांच्या योजनांची पडताळणी करा

ॲड. धर्मपाल मेश्राम ः अनुसूचित जाती, जमातीच्या योजनांचा आढावा

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ ः महाराष्ट्र शासनाच्यावतीने अनुसूचित जाती आणि जमाती या वर्गाच्या कल्याणाकरिता अनेक योजना आहेत आणि त्यासाठीची विशेष तरतूददेखील उपलब्ध आहे. तरीही हा निधी एकतर खर्च केला जात नाही किंवा योग्य लाभार्थ्यांपर्यंत त्याचा लाभ पोहचत नाही. याबाबत अर्जदारांची पडताळणी करण्यापासून त्या कामाची पातळी जोखण्याची जबाबदारी आयोगाकडून केली जाईल, असे सक्त निर्देश अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य (सचिव दर्जा) ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी दिले.
येथील सहाय्यक आयुक्त समाजकल्याण यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. बैठकीला सहाय्यक आयुक्त दीपक घाटे, गटविकास अधिकारी जे. पी. जाधव, जात पडताळणी समितीच्या संशोधन अधिकारी शीतल सोनटक्के, महावितरणचे अधीक्षक अभियंता नितीन पळसुलेदेसाई, जि. प. सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता मानसिंग पाटील आदी उपस्थित होते.
ॲड. मेश्राम यांनी विभागनिहाय सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले, अनुसूचित जाती, जमाती वर्गाच्या कल्याणाकरिता विविध विभागांच्या असणाऱ्या योजना, त्याची सद्यःस्थिती याचा अहवाल प्रत्येकाने द्यावा. समाजातील वंचित घटकांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या योजना अत्यंत महत्वाच्या आहेत. शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या योजनांचा लाभ समाजातील योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहचवावा. दिलेल्या लाभार्थ्यांची पडताळणीही करावी. प्रशिक्षण घेतलेल्या लाभार्थ्यांना नोकरी मिळाली आहे का, अथवा त्यांनी व्यवसाय सुरू केला आहे का याची माहिती विभागाने वेळोवेळी घ्यायला हवी. कोणतीही प्रलंबित प्रकरणे वा प्राप्त तक्रारी या तत्काळ निकाली काढाव्यात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com