सुंदर शाळा स्पर्धेत माभळे शाळा द्वितीय

सुंदर शाळा स्पर्धेत माभळे शाळा द्वितीय
Published on

-rat३p२२.jpg-
P२४N२९०६९
संगमेश्वर ः माभळे घडशीवाडी येथील द्वितीय क्रमांक प्राप्त शाळा.
-----------

सुंदर शाळा स्पर्धेत माभळे शाळा द्वितीय

दोन लाखांचे बक्षीस ; विविध उपक्रमांची दखल
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ३ ः मुख्यमंत्री माझी शाळा मुख्यमंत्री, सुंदर शाळा स्पर्धेत संगमेश्वर तालुक्यातील माभळे घडशीवाडी शाळेने तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे शाळेला दोन लाखांचा निधी बक्षीस म्हणून दिला जाणार आहे.
माभळे शाळा पहिली ते चौथीपर्यंत असून पटसंख्या ४१ आहे. या अभियानाच्या माध्यामातून शाळेचा प्रभावी विस्तार करण्याच्यादृष्टीने पायाभूत सुविधा, शासन अंमलबजावणी, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच शाळेत अद्ययावत तंत्रज्ञानाचा अध्यापनात वापर, विद्यार्थ्यांसाठी वाचनालय, विद्यार्थ्यांसाठी जादा समयदान वर्ग, विविध कार्यानुभवात्मक उपक्रम, महावाचन, इको क्लब फॉर मिशन लाइफ, शिक्षणसप्ताह, आनंददायी शनिवार, स्वच्छता मॉनिटर, कला-क्रीडा गुणांचा विकास, शासकीय योजनांचा लाभ अशा विविध उद्दिष्टांवर शाळेमध्ये काम करण्यात आले. त्यामुळे तालुक्यातून शाळेला द्वितीय क्रमांक मिळाला.
गटशिक्षणाधिकारी प्रदीप पाटील, केंद्रप्रमुख दिलीप जाधव, बीआरसी तज्ञ, शिक्षकांचे यासाठी सहकार्य लाभले. अभियानाच्या यशस्वीतेसाठी सरपंच, उपसरपंच, सदस्य शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नेहा भोसले, सर्व सदस्य, काष्टेवाडी व घडशीवाडीतील ग्रामस्थ, मुख्याध्यापिका श्वेता संसारे व सहकारी शिक्षक शिवप्रसाद गड्डमवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com