

-rat३p३२.jpg-
P२४N२९१०१
रत्नागिरी : स्पर्धांमधील विजेत्यांसमवेत लायन्स क्लबचे अध्यक्ष गणेश धुरी, शिल्पा पानवलकर, संजय पटवर्धन, मुख्याध्यापक गजानन रजपूत व शिक्षक.
--------
अभ्यंकर विद्यालयात दिव्यांग दिन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त (कै.) के. प. अभ्यंकर मूकबधीर विद्यालयात मुलांच्या चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. त्याचे बक्षीस वितरण आणि विद्यालयात विविध प्रकारचे फनी गेम्स घेण्यात आले.
आज देवयानी जावकर यांनी उठावशिल्प तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखवले व मुलांकडून तयार करून घेतले. त्यामुळे शाळेतील वातावरण आनंदमय व उत्साही निर्माण झाले. त्यानंतर बक्षीस वितरण झाले. या वेळी प्रदीप शिरगांवकर व कुटुंबीय यांनी खेळाचे साहित्य मुलांना दिले. लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी यांच्या माध्यमांतून मुलांना बक्षिसे व खाऊ देण्यात आले. कार्यक्रमाला लायन्स क्लबचे अध्यक्ष गणेश धुरी, शिल्पा पानवलकर, संजय पटवर्धन, मूकबधीर विद्यालयाचे व्यवस्थापक राजाराम पानगले उपस्थित होते. मुख्याध्यापक गजानन रजपूत यांनी जागतिक दिव्यांग दिनाचे महत्व मुलांना सांगितले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राजकुमार कसबे, संतोष शिंदे, रमेश घवाळी आदींचे सहकार्य लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.