

रामगड किल्ल्यावर श्रमदान मोहीम
खेड ः तालुक्यातील नव्याने उजेडात आलेल्या रामगडवर (रामदुर्ग) श्रमदान मोहीम राबवण्यात आली. मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस असलेल्या बुरूजाची आतील बाजू व तटबंदीच्या आतील बाजूच्या भागाची स्वच्छता करण्यात आली. पडलेल्या तटबंदीचे दगड पुन्हा व्यवस्थित रचण्यात आले. या मोहिमेमध्ये दुर्गवीरचे रोहित बालडे, राकेश इंदुलकर, स्वप्नील पाडावे, स्वप्नील गायकवाड, माणगावमधून विठ्ठल केंबळे आणि सुयोग पाटील, संगमेश्वरमधून यश ओकटे आणि मुंबईमधून आकाश गायकवाड सहभागी झाले होते.
खेडमध्ये संविधान जनजागृती रॅली
खेड ः संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त खेड तालुका बौद्ध कर्मचारी संघटनेच्या वतीने संविधान जनजागृती रॅली काढण्यात आली. हा कार्यक्रम खेड तालुका बौद्ध कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष व खेड तालुका बौद्ध समाजसेवा संघाचे अध्यक्ष मंदार हळदे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. रॅलीमध्ये विविध गावांतील बंधू-भगिनी, विविध कर्मचारी वर्ग व तालुक्यातील पुरोगामी संघटनांनी सहभाग घेतला होता. खेड तालुका बौद्ध समाजसेवा संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष व कार्यकारिणीचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. कर्मचारी संघटनेचे माजी कार्याध्यक्ष, निवृत्त केंद्रीय प्रमुख दिलीप सावंत यांना सन्मानपत्र देऊन सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. रॅलीची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथून होऊन खेड बाजारपेठ, तीनबत्ती नाका, जिजामाता उद्यान येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पोलिस ठाणे, तहसील कार्यालयामार्गे, बसस्थानकमार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे सांगता करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.