

-rat३p३६.jpg-
P24N29345
रत्नागिरी : येथील फोटोग्राफर अक्षय परांजपे याला दिव्यांग प्रेरणा पुरस्कार प्रदान करताना जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार. सोबत मान्यवर
------------
अक्षय परांजपेला दिव्यांग प्रेरणा पुरस्कार
आस्था फाउंडेशन ; दिव्यांगावर मात करून यश
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ : आस्था सोशल फाउंडेशन या दिव्यांगांसाठी समर्पित संस्थेकडून आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनी दिव्यांग प्रेरणा पुरस्कार अक्षय परांजपे याला देण्यात आला. ८५ टक्के दिव्यांगत्वावर मात करत यशस्वी फॅशन अँड प्रॉडक्ट फोटोग्राफर म्हणून अक्षय सुपरिचित आहे. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ व पाच हजार रुपयांचा धनादेश असे होते. आपल्या कामाने त्याने रत्नागिरीसह पुण्या-मुंबईत स्वतःचा ठसा उमटवला आहे.
आस्थातर्फे दिव्यांग पुरस्काराचे दरवर्षी वितरण करण्यात येते. यावर्षीचा दिव्यांग प्रेरणा पुरस्कार अक्षयला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे वितरण समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात केले. शामराव पेजे सभागृहात हा कार्यक्रम झाला. या प्रसंगी जिल्हा समाजकल्याण अधिकारी जयेंद्र जाधव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे ॲड. अजित वायकूळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव (सामान्य प्रशासन), आस्था सोशल फाउंडेशनच्या संस्थापिका, सचिव सुरेखा पाथरे, खजिनदार साक्षी चाळके, आस्था दिव्यांग हेल्पलाईनचे जिल्हा समन्वयक संकेत चाळके, आस्था थेरपी सेंटरच्या प्रमुख संपदा कांबळे आदी उपस्थित होते.
---
अक्षयचा संघर्षमय प्रवास
अक्षय परांजपे हा काही वर्ष पुण्यात फोटोग्राफी करत आहे. त्याला लहानपणी विल्सन हा दुर्मिळ अनुवांशिक आजार झाला; परंतु आजारावर मात करत फोटोग्राफीचा छंद जोपासला. या आजारपणात शरीराला कंप येत असेल तर सहजच कॅमेरा हातातून घसरू शकतो; पण अक्षयच्या बाबतीत असे कधीच घडले नसल्याचे त्याने सांगितले. याउलट त्याने त्याच्या आयुष्यातील अनेक सुंदर क्षण टिपले आहेत. त्याच्या या प्रवासावर आता पुरस्काराने मोहोर उमटली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.