आरोंदा हायस्कूलमध्ये शुक्रवारी ''महामेळावा''

आरोंदा हायस्कूलमध्ये
शुक्रवारी ''महामेळावा''
Published on

संक्षिप्त

आरोंदा हायस्कूलमध्ये
शुक्रवारी ‘महामेळावा’
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ३ ः आरोंदा हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा महामेळावा शुक्रवारी (ता. ६) प्रशालेच्या पटांगणावर आयोजित केला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालरोगतज्ज्ञ डॉ. बळवंत केरकर असणार आहेत. यावेळी लेफ्टनंट कर्नल पद्माकर नाईक, प्रमुख मार्गदर्शक संत राऊळ महाविद्यालय कुडाळचे माजी प्राचार्य डॉ. अरुण पणदूरकर, डॉ. पी. वाय. नाईक, संजीव नाईक, आरोंदा सरपंच गीतांजली वेळणेकर, सूर्यकांत पोखरे, प्रा. स्मिता पार्सेकर, श्याम नाईक, संदीप पेडणेकर आदी उपस्थित राहणार आहेत. सकाळी १०.३० वाजता स्वागत व प्रास्ताविक, ११ वाजता माजी विद्यार्थ्यांचे मनोगत व प्रमुख मार्गदर्शकांचे भाषण, दुपारी १ ते २ पर्यंत स्नेहभोजन, २ वाजता विश्रांती, २.३० वाजता माजी विद्यार्थी सुसंवाद व चर्चा, सायंकाळी ४.३० वाजता आभार व समारोप, रात्री ७.३० वाजता जय हनुमान दशावतार नाट्य मंडळ आरोस यांचा ''विंध्यवासिनी विंध्येश्वरी'' हा नाट्यप्रयोग होणार आहे. या कार्यक्रमाला सर्व माजी विद्यार्थी, ग्रामस्थ व हितचिंतकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आरोंदा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, शालेय समिती, आरोंदा हायस्कूल, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे.

देवगड किनारी भागात
ढगाळ वातावरण कायम
देवगड, ता. ३ ः तालुक्याच्या किनारी भागात आजही दिवसभर ढगाळ वातावरण कायम होते. किनारी भागात काही ठिकाणी सोमवारी (ता.२) रात्री तसेच आज पहाटे हलका पाऊस झाला. पावसामुळे तसेच ढगाळ वातावरणामुळे कीडरोगांच्या प्रादुर्भावाच्या शक्यतेने आंबा बागायतदारांनी फवारणीत वाढ केली आहे. दरम्यान, दिवसभर उष्णतेत वाढ होऊन उकाडा जाणवत होता. किनारी भागात बदलत्या वातावरणाचा अनुभव येत आहे. अधूनमधन किनारी भागातील वातावरण ढगाळ बनत होते. कालही ढगाळ वातावरण होते. सोमवारी रात्री काही भागात हलका पाऊस झाला. आज दिवसभर ढगाळ वातावरण कायम होते. त्यामुळे बागायतदारांचे धाबे दणाणले आहेत.

वराड येथील शिबिरात
१६७ जणांची चिकित्सा
मालवण, ता. ३ : कट्टा सहकारमहर्षी प्रा. डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथीनिमित्त (कै.) डी. बी. ढोलम चॅरिटेबल ट्रस्ट व ग्रामविकास मंडळ, कावळेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच एस. एस. पी. एम. लाईफ टाईम हॉस्पिटल, पडवे यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिर वराड कावळेवाडी येथील सहकारमहर्षी प्रा. डी. बी. ढोलम स्मृतीस्थळ येथे पार पडले. याचा १६७ रुग्णांनी लाभ घेतला. शिबिरात हृदयरोग तपासणी, नेत्र, युरॉलॉजी, अस्थिरोग तपासणी, जनरल सर्जरी, नेफ्रोलॉजी, कर्करोग तपासणी, दंतरोग चिकित्सा, प्रसूतीशास्त्र आणि स्त्री रोग तपासणी, मोफत रक्त तपासणी, इसीजी व मोफत औषधे देण्यात आली. शिबिराचा मालवण, वराड, कट्टा, नांदोस, गुरामवाडी, कावळेवाडी या भागातील सुमारे १६७ गरजू ग्रामस्थांनी लाभ घेतला. यावेळी (कै.) डी. बी. ढोलम चॅरिटेबल ट्रस्ट व ग्रामविकास मंडळ कावळेवाडी तसेच समस्त ढोलम कुटुंबीय यांच्या वतीने प्रा. डी. बी.ढोलम यांचे समाजकार्य अशा पद्धतीने पुढे सुरू ठेवण्यासाठी असेच समाजोपयोगी उपक्रम यापुढेही राबविले जातील, असे सांगण्यात आले. यावेळी देवेन (पप्पू) ढोलम, (कै.) डी बी ढोलम यांच्या मुली बेबी, रेखा, मनीषा, दादा रावले, महादेव मलये, अनिल फणसेकर, दीपक भोगटे, छोटू ढोलम, बाबा ढोलम, अवधूत चव्हाण, सुनील पोखरणकर, प्रणेश ढोलम, गणपत पोखरणकर, नीतेश खडपे, विकास लुडबे, नितीन लुडबे, अश्‍विन ढोलम, अनिल चव्हाण, परमानंद वेंगुर्लेकर, सतीश वेंगुर्लेकर, योगेश वेंगुर्लेकर, अवधूत वेंगुर्लेकर, रोहन चव्हाण, प्रेम परब, दिलीप वेंगुर्लेकर, डॉ. प्रथमेश वालावलकर, समीर रावले, प्रवीण मिठबावकर, सागर चव्हाण, अॅड. प्रदीप मिठबावकर, गणेश वाईरकर, वंदेश ढोलम, प्रसाद शिरोडकर, शिवा शिरोडकर, विनू चव्हाण तसेच ढोलम चॅरिटेबल ट्रस्ट व ग्रामविकास मंडळाचे सदस्य व कावळेवाडी, लुडबेवाडीतील ग्रामस्थ आणि महिला वर्ग यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com