रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालय दोषी नाही

रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालय दोषी नाही
Published on

रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालय दोषी नाही

शिकाऊ, निवासी डॉक्टरना विद्यावेतन; दंडात्मक कारवाईच्या नोटिशीला उत्तर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ : राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने देशभरातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना पत्र पाठवून पदवी शाखेतील शिकाऊ (इंटर्न्स), निवासी डॉक्टर यांना देण्यात येणाऱ्या विद्यावेतनाची माहिती मागितली होती. राज्यातील २० वैद्यकीय महाविद्यालयांनी आयोगाला ही माहिती न दिल्याने दंडात्मक कारवाई का करू नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यामध्ये रत्नागिरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश आहे; परंतु या वैद्यकीय महाविद्यालयाची अजूनही शेवटची बॅच पास झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांबाबत माहिती उपलब्ध नाही. यात महाविद्यालयाचा दोष नाही, असे आयोगाला कळवल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले.
वर्षाच्या सुरवातीला सर्वोच्च न्यायालयाने आयोगाकडून देशातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील पदवी शाखेतील इंटर्न्स, निवासी डॉक्टर यांना देण्यात येणाऱ्या विद्यावेतनाची माहिती मागितली होती. त्यानुसार देशभरातील १९८ वैद्यकीय महाविद्यालयांनी माहिती दिलेली नाही. त्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यामध्ये शासकीय महाविद्यालयांमध्ये धुळे येथील श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला, राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय ठाणे, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड, स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परभणी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अलिबाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार या महाविद्यालयांचा समावेश आहे. नोटीस बजावण्यात आलेल्या खासगी महाविद्यालयांचाही समावेश आहे.
----
कोट
रत्नागिरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अजूनही शेवटची बॅच पास झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांबाबत माहिती उपलब्ध नाही. आपले महाविद्यालय एम. डी., एमएस निवासी स्तरावर असल्याने या दोन्ही सुविधा आपल्या महाविद्यालयामध्ये नाहीत. त्याबाबत प्राप्त नोटिसीवरून महाविद्यालयाकडून आयोगाला आवश्यक माहिती देण्यात आलेली आहे. याबाबत महाविद्यालयाचा कोणताही दोष नाही.
-जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता-शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com