पान एक-सिंधुदुर्गात अवकाळीच्या सरी

पान एक-सिंधुदुर्गात अवकाळीच्या सरी
Published on

सिंधुदुर्गात अवकाळीच्या सरी
बागायतदार चिंतेत; अजूनही वातावरण ढगाळ
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ३ ः जिल्ह्याच्या अनेक भागात सोमवारी (ता. २) मध्यरात्री एकपासून पावसाच्या सरी बरसण्यास सुरुवात झाली. काही भागात जोरदार सरी बरसल्या. जिल्ह्यात आज दिवसभर पावसाचे वातावरण होते. हवामान विभागाने शनिवार (ता. ७) पर्यंत पावसाचा अंदाज दिल्यामुळे आंबा, काजू बागायतदारांची चिंता आणखीनच वाढली आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर ‘फेइंजल’ चक्रीवादळात झाले. वादळाचा गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात परिणाम दिसून येत आहे. दोन-तीन दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. त्यानंतर काल मध्यरात्रीपासून मालवण, वेंगुर्ले परिसरात सरी सुरू झाल्या. त्यानंतर आज पहाटे चारपासून सावंतवाडी, कुडाळ, देवगड, दोडामार्ग तालुक्यांमध्ये देखील सरी बरसल्या. सकाळी वैभववाडी आणि कणकवली तालुक्यांत हलक्या सरी बरसल्या. काही भागात वाऱ्यांचा वेग देखील वाढला होता. जिल्ह्यात सतत पाऊस पडत नसला तरी सर्वत्र पावसाचे वातावरण आहे. अनेक भागात तर कोणत्याही क्षणी पुन्हा पाऊस पडेल, असे वातावरण आहे.
हवामान विभागाने सुरुवातीला ३ आणि ४ डिसेंबरला पावसाचा अंदाज दिला होता. आता शनिवारपर्यंत पाऊस पडेल, असा अंदाज दिला आहे. या नव्या अंदाजामुळे आंबा, काजू बागायतदारांची झोप उडाली आहे. आंबा, काजूवर कीडरोग आणि बुरशींचा प्रादुर्भाव होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे बागायतदारांची चिंता आणखीनच वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com