रत्नागिरीत ८ रोजी परिसंवाद

रत्नागिरीत ८ रोजी परिसंवाद

Published on

नद्या, खाड्या संवर्धनावर परिसंवाद

गोगटे महाविद्यालयात आज आयोजन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७: येथील पर्यावरण संस्था, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) आणि मरीन सिंडीकेट प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने कोकणातील नद्या आणि खाड्या यावर सद्यस्थिती, वापर आणि संवर्धन यावर परिसंवाद आयोजित केला आहे. येत्या रविवारी (ता. ८) सकाळी १०.३० वाजता गोगटे महाविद्यालयाच्या डॉ. ज. शं. केळकर सभागृहात परिवसंवाद होईल.
यामध्ये डॉ. सुमंत नरसिंगराव पांडे आणि तज्ज्ञ अविनाश निवते हे प्रमुख सहभागी होणार आहेत. डॉ. पांडे यांनी महाराष्ट्र शासनामध्ये तीन दशकांपेक्षा अधिक सेवा दिली आहे. यशदा येथे जलसाक्षरता केंद्र स्थापन करणे यामध्ये योगदान त्याचप्रमाणे राज्य जलसाक्षरता केंद्राच्या कार्यकारी संचालक या नात्याने कार्यरत होते. पाणीविषयक अनेक पुस्तके लिहिली आहेत. सकाळ, दै. अॅग्रावनमधून मागील अडीच वर्षापासून दिशा ग्रामविकासाच्या या सदरात लिखाण करत आहेत. ज-जैवविविधतेचा हे ग्रामपंचायतीसाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीचे कार्यपुस्तक तयार आहे. क्षारपड जमीन अभ्यास आणि उपाय यावर त्यांचे विशेष कार्य आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील काजळी नदीसह राज्यातील विविध नद्यांच्या गाळमुक्तीसाठी चळवळ राबवली आहे. अविनाश निवाते यांनी अॅग्रीकल्चरल इंजिनिअरिंगमध्ये बी. टेक केले आहे. पाणी व सांडपाणी व्यवस्थापनात त्यांचे विशेष योगदान आहे. पर्यावरण जागृती, नैसर्गिक शेती व कंपोस्टिंग, जैवविविधता संवर्धनासाठी ते कार्य करत आहेत. शेतकऱ्यांच्या गटांना मार्गदर्शन करत आहेत. अधिकाधिक नागरिक, विद्यार्थ्यांनी या परिसंवाद कार्यक्रमासाठी यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
-------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com