आशाआकांक्षा पूर्ण करतील- अॅड. पटवर्धन
-rat५p३३.jpg-
P२४N२९७७७
रत्नागिरी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्यानिमित्त भाजपातर्फे जल्लोष करताना अॅड. दीपक पटवर्धन आणि पदाधिकारी, कार्यकर्ते.
----------
फडणवीस जनतेच्या अपेक्षा पूर्ण करतील
अॅड. पटवर्धन ः रत्नागिरीत जल्लोष
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ : महाराष्ट्रातील कोट्यवधी जनतेच्या आशाआकांक्षा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपली कार्यकुशलता, नेतृत्व आणि कार्यक्षमता पूर्णपणे वापरतील. देवेंद्रजी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत असून त्यांना रत्नागिरीकरांच्यावतीने शुभेच्छा देतो, असे प्रतिपादन दक्षिण रत्नागिरी जिल्हा विधानसभा निवडणूक समन्वयक अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शपथ घेतली. त्याचे थेट प्रक्षेपण व जल्लोष कार्यक्रमाचे आयोजन मारूती मंदिर येथे करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. लाडू, मिठाई वाटप केले. भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी फुगड्या घालून आनंदोत्सव साजरा केला. ढोलताशांचा गजर केला.
या वेळी रत्नागिरी विधानसभा निवडणूक समन्वयक सचिन वहाळकर, जिल्हा उपाध्यक्ष सुशांत उर्फ मुन्ना चवंडे, जिल्हा चिटणीस सचिन करमरकर आणि जिल्हा चिटणीस उमेश कुळकर्णी, माजी नगरसेवक राजू तोडणकर, समीर तिवरेकर, अशोक मयेकर, अॅड. विलास पाटणे, प्रवीण देसाई, पल्लवी पाटील, संपदा तळेकर यांच्यासमवेत धामणसेचे सरपंच अमर रहाटे, श्रीकांत मांडवकर, माजी सरपंच संदीप शिंदे, मंजिरी पाडळकर, ओबीसी जिल्हाध्यक्ष भाई जठार, ऐश्वर्या जठार, शेखर लेले, ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संध्याकाळी ५ वाजल्यापासून मारूती मंदिर येथे ढोलताशांचा गजर करण्यात येत होता. मी पुन्हा आलोच... हा देवेंद्र फडणवीस यांचा लावलेला बॅनर लक्षवेधी ठरला.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

