शहरात विजयी फेरी काढत भाजपाने केला जल्लोष

शहरात विजयी फेरी काढत भाजपाने केला जल्लोष

Published on

rat६p८.jpg-
P२४N२९८६३
रत्नागिरी : मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर भाजपने गुरूवारी शहरात विजयी फेरी काढून जल्लोष केला.

रत्नागिरीत भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ : मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्याचा कार्यक्रम थेट प्रक्षेपित करून आणि शहरात विजयी फेरी काढून रत्नागिरी शहर व तालुका भाजपने जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी आणि ढोलताशांचा गजर करून आनंदोत्सव साजरा केला. भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम करण्यात आला.
रत्नागिरी उत्तर व दक्षिण मंडल व रत्नागिरी शहर मंडलातर्फे भाजप जिल्हा कार्यालयाशेजारी या कार्यक्रमाला पदाधिकारी, शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. फडणवीस यांनी शपथ घेताच कार्यकर्त्यांनी ढोलताशांच्या गजरात ठेका धरला. शहराध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी उत्स्फूर्तपणे ढोल वाजवून आपला आनंद व्यक्त केला. महिलांनी फुगड्या घालून, फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. त्यानंतर भाजप कार्यालयापासून श्री राममंदिर ते विठ्ठल मंदिर आणि पुन्हा भाजप कार्यालय अशी उत्स्फूर्तपणे विजयी फेरी काढली. नागरिकांना लाडू आणि पेढे वाटले.
या वेळी तालुकाध्यक्ष दादा दळी व विवेक सुर्वे, शहराध्यक्ष राजेंद्र फाळके, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, तालुका सरचिटणीस सुशांत पाटकर, उमेश देसाई, महेश खानविलकर, शहर सरचिटणीस मंदार मयेकर, मंदार खंडकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत डिंगणकर, सरचिटणीस सतेज नलावडे, कामगार मोर्चाचे संतोष बोरकर, लीलाधर भडकमकर, दादा ढेकणे तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com