शिक्षण व संशोधन अभिवृत्ती पुस्तक

शिक्षण व संशोधन अभिवृत्ती पुस्तक

Published on

- rat६p१.jpg
२४N२९८५५
- दापोली ः शिक्षण व संशोधन अभिवृत्ती पुस्तकाचे प्रकाशन करताना कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे. शेजारी आर. व्ही. डॉ. दशरथ भोसले व लेखक डॉ. भारत कऱ्हाड.

‘शिक्षण व संशोधन अभिवृत्ती’चे प्रकाशन
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. ७ ः कोकण कृषी विद्यापीठ येथे नेट-सेट परीक्षेच्या शिक्षण व संशोधन अभिवृत्ती, पेपर- १ या पुस्तकाचे प्रकाशन कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी आर. व्ही. बेलोसे एज्युकेशन फाउंडेशनचे कार्यवाह डॉ. दशरथ भोसले उपस्थित होते.
शिक्षण व संशोधन अभिवृत्ती पुस्तकाचे लेखक डॉ. भारत कऱ्हाड आणि डॉ. गोपाळ आलापुरे हे या विषयातील तज्ज्ञ असून, त्यांनी विस्तृत ज्ञानाचा उपयोग करून नेट-सेट परीक्षेच्या तयारीसाठी अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन प्रदान केले आहे. या पुस्तकात परीक्षेच्या अभ्यासक्रमाला अनुसरून आवश्यक माहिती दिली गेली आहे. पुस्तकाची रचना अशी आहे की, ती विद्यार्थ्यांना पेपर १ची सर्व तयारी करण्यास मदत होईल. अशी माहिती डॉ. कऱ्हाड यांनी दिली. या वेळी कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी लेखक डॉ. भारत कऱ्हाड यांनी त्यांच्या आजारपणाच्या काळात हे पुस्तक लिहिले असल्यामुळे त्यांचे कौतुक केले परीक्षा तयारीसाठी ते एक अमूल्य साधन ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. डॉ. भारत कऱ्हाड आणि डॉ. गोपाळ आलापुरे यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना एकात्मिक आणि सुबोध मार्गदर्शन मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com