दिव्यांगांनी स्वाभिमानाने जगावे
-ratchl५१.jpg ः
P२४N२९७४५
चिपळूण ः दिव्यांग मेळाव्यात मनोगत व्यक्त करताना माजी नगरसेवक शशिकांत मोदी.
----------------
दिव्यांगांनी स्वाभिमानाने जगावे
शशिकांत मोदी ः चिपळुणात अपंग दिनानिमित्त मेळावा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ७ः नगर पालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्था त्यांच्या ५ टक्के दिव्यांग निधीतून काहीतरी देतील आणि मी जगेन, ही भावना मनात निर्माण होऊ देऊ नका. कायमस्वरूपी उदरनिर्वाहाचं साधन निर्माण करण्यासाठी ५ टक्के दिव्यांग निधीचा वापर करा आणि आयुष्यभर कष्टाने खा आणि स्वाभिमानाने जगा. या पुढील काळात आपण, अपंग दिन नाही तर स्वावलंब दिन साजरा करू, असे आवाहन माजी नगरसेवक व शिवसेना उबाठा पक्षाचे शहरप्रमुख शशिकांत मोदी यांनी केले.
दिव्यांग समन्वय समिती, चिपळूण व चिपळूण नगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक अपंग दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात माजी नगरसेवक शशिकांत मोदी बोलत होते. चिपळूण अर्बन बँक तुम्हा दिव्यांगांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर करण्यासाठी कटिबद्ध आहे. कमीत कमी कागदपत्रात तुमचे कर्ज मंजूर करण्यात येईल, असे वचन चिपळूण अर्बन बँकेचे अध्यक्ष, माजी नगरसेवक मोहनशेठ मिरगल यांनी दिले. चिपळूण नगर पालिकेचे प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर यांनी नगर पालिका स्तरावर दिव्यांगांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे सांगितले. लायन्स क्लब गॅलॅक्सी युनिटी अध्यक्षा तमिज मुल्ला यांनी मेळाव्यात मनोगत व्यक्त केले. अपंग सेवा संस्थेचे उपाध्यक्ष शरीफ मुजावर यांनी अपंगत्व दाखला, पालकत्व दाखला काढण्याबाबत मार्गदर्शन केले. सुमारे २०० दिव्यांग मेळाव्यात सहभागी झाले होते.
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

