साखरपा-कृषी पदवीधर तरुणाने घेतले कलिंगडाचे उत्पन्न
rat6p15.jpg
29899
साखरपा : शुभम दोरकडे याने केलेली कलिंगड लागवड.
----------
कृषी पदवीधर तरुणाने
घेतले कलिंगडाचे उत्पन्न
साखरपा, ता. ७ ः लोवले येथील कृषी पदवीधर युवकाने शेतात कलिंगड लागवड करत उत्पन्न घेण्याचा प्रयत्न केला आहे. यंदा त्याने पाच गुंठे जमिनीवर कलिंगड लागवड केली आहे.
संगमेश्वर तालुक्यातील लोवले येथील शुभम दोरकडे या तरुणाने दापोली कृषी विद्यापिठातून पदवी घेतली. त्यानंतर त्याने नोकरी अथवा मुंबई येथे जाण्याचा विचार न करता वडिलोपार्जित जमिनीत शेती करण्याचा निर्णय घेतला. यावर्षी त्याने पाच गुंठे जागेत कलिंगड लागवड केली आहे. घरीच बियाणे रूजवून त्यापासून रोपे तयार करून त्यांची लागवड केली आहे. ठिबक सिंचन पद्धतीने त्याने पाण्याचे नियोजन केले आहे. सेंद्रिय खतांच्या वापरावर त्याचा भर आहे. कलिंगडाबरोबरच मिरची, पालेभाज्या आणि भेंडी लागवडही त्याने केली आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

