पावस-नवलादेवी मंदिराची साफसफाई

पावस-नवलादेवी मंदिराची साफसफाई

Published on

पेजे महाविद्यालय विद्यार्थ्यांकडून
नवलादेवी मंदिराची स्वच्छता

पावस, ता. ७ ः शिवार आंबेरे येथील लोकनेते शामराव पेजे महाविद्यालयातील एनएसएस विभागाचे विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिर बेनी शाळेत सुरू आहे. शिबिरात नवलादेवी मंदिर साफसफाई व नंतर सायबर गुन्हे या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी लांजा येथील पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे उपस्थित होते. बगळे यांनी स्वयंसेवकांना सायबर गुन्हे कसे घडतात आणि त्याचे समाजावर विपरित परिणाम कसे होतात, याबाबत मार्गदर्शन केले. राष्ट्रीय रत्नागिरी सेवा योजना विभागाचे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक डॉ. राहुल मराठे यांनी सदिच्छा भेट दिली. या वेळी प्रा. कल्पना मेस्त्री, अनुप देसाई आदी उपस्थित होते.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com