450 विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणातून ठरणार

450 विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणातून ठरणार

Published on

जिल्ह्याची शैक्षणिक गुणवत्ता ठरणार

न्यास चाचणी ः ४५० विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा; तळातून वर येणार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ ः जिल्ह्यातील १२३ शाळांमध्ये राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणांतर्गत (न्यास) चाचणी घेण्यात आली. यामध्ये तिसरी, सहावी, नववीचे मिळून ४५० विद्यार्थी या परीक्षेत सहभागी झाले होते. यामधून जिल्ह्याची शैक्षणिक गुणवत्ता ठरवण्यात येणार आहे. मागील परीक्षेत रत्नागिरी जिल्हा तिसरी, पाचवीत राज्यात पहिल्या दहा क्रमांकात तर आठवी, दहावीत तळात समाविष्ट होता. यंदा जिल्ह्याची गुणवत्ता किती राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणाच्या अनुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) शाळांना परिपत्रकाद्वारे सूचना दिलेल्या होत्य. गतवेळी तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात येत होते. यावर्षी ३री, ६वी आणि ९ वीतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीतील संपादणुकीचे मूल्यांकन करणे, देशातील शिक्षणप्रक्रियेच्या आरोग्याचे मूल्यांकन करण्यासाठी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण करण्यात येत आहे. जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय अशा तीन पातळ्यांवर ही सर्वेक्षण चाचणी घेतली जाते. सर्वेक्षणातील शाळा यादृच्छिक नमुना (रँडम सॅम्पलिंग) पद्धतीने निवडण्यात आल्या आहेत. यासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत गणित, मराठी, परिसर अभ्यास, इंग्रजी या विषयांचा समावेश होता. या परीक्षेतील विद्यार्थ्यांचे पेपर तपासण्यात येणार असून, त्याद्वारे जिल्ह्याची शैक्षणिक गुणवत्ता ठरणार आहे.
---
चौकट

*तालुका* शाळा
*दापोली* ६
*मंडणगड* ४
*खेड* १७
*गुहागर* ८
*चिपळूण* २६
*रत्नागिरी* ३३
*लांजा* ५
*राजापूर* १२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com