खेड-खेड-भोस्ते रेल्वेस्थानक मार्गाची चाळण

खेड-खेड-भोस्ते रेल्वेस्थानक मार्गाची चाळण

Published on

खेड-भोस्ते रेल्वेस्थानक मार्गाची चाळण

खेड, ता. ७ : खेड-भोस्ते रेल्वेस्थानक मार्गावर ग्रामसडक योजनेतून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चूनही या मार्गाची चाळण झाली आहे. याच मार्गावरून प्रशासकीय अधिकाऱ्यांचाही सातत्याने प्रवास सुरू असतो. मार्गाच्या डागडुजीसाठी संबंधित खात्याला आदेश देण्याची तसदी घेतली जात नसल्याने वाहनचालकांची कसरत कायम आहे.
रेल्वेस्थानकात ये-जा करण्यासाठी या मार्गाचा वापर होतो याशिवाय रिक्षा व्यावसायिकांच्यादृष्टीनेही हा मार्ग सोयीचा ठरत आहे. ग्रामसडक योजनेतून वेरळ-भोस्ते कोंडिवली शिवमार्गावर तब्बल ९ कोटीहून अधिक रुपयांचा खर्च करून खड्ड्यांमुळे वाहनचालकांची कसरत कायमच आहे. रस्त्याच्या कामास प्रारंभ झाल्यापासूनच कामाच्या दर्जाबाबत पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केले होते. या मार्गावरील दर्जाहीन कामाबाबत ग्रामस्थांनी सातत्याने संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनदेखील ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रताप केला आहे. याचा फटका प्रवाशांना बसत असून खड्ड्यांमुळे अपघातही घडत असल्याने वाहनचालकांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com