शिक्षकांची डॉ. बाबासाहेबांना काव्यमय आदरांजली
-rat६p३४.jpg-
२४N२९९७४
दापोली ः शिक्षकमित्रांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काव्यमय आदरांजली अर्पण करण्यात आली.
---------
डॉ. बाबासाहेबांना काव्यमय आदरांजली
प्राथमिक शिक्षक संघाचे जालगावकरांचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
गावतळे, ता. ७ः महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दापोलीतील शिक्षकांनी काव्यमय आदरांजली अर्पण केली. जीवनचरित्रावर आणि कार्यकर्तृत्वावर लिहिल्या गेलेल्या कवितांचे वाचन, असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते. दापोली तालुका प्राथमिक शिक्षकसंघाचे अध्यक्ष संदीप जालगावकर यांच्या पुढाकाराने शिक्षकमित्रांनी दापोलीतील पद्मश्रद्धा हॉलमध्ये या भावपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पद्मश्रद्धा हॉलमध्ये या कार्यक्रमात मुख्यत्वे नव्या पिढीतील कवींच्या कवितांचा समावेश केला होता. समता-न्याय-बंधूता या मुल्यांचे अभिसरण नव्या पिढीच्या कवींमधून कसे अभिव्यक्त होते हे मांडण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून केला गेला आहे. हा कार्यक्रम मुंबईतील सुप्रसिद्ध पार्थ थिएटरने प्रसारित केला असून, नाट्य दिग्दर्शक मंगेश सातपुते यांच्या संकल्पनेतून साकार झाला आहे. या कार्यक्रमाचे संहिता लेखन सुप्रसिद्ध कवयित्री वृषाली विनायक यांनी केले आहे. या कार्यक्रमात समाविष्ट केल्या गेलेल्या नव्या पिढीच्या काही कवितांना सध्याचे आघाडीचे संगीतकार आशुतोष वाघमारे यांनी संगीत दिले आहे. ज्येष्ठ रंगकर्मी सुधीर चित्ते यांचे दिग्दर्शन लाभलेला हा भावानुभव मंगेश सातपुते, वृषाली विनायक, आशुतोष वाघमारे आणि स्वतः सुधीर चित्ते या चार दिग्गज कलाकारांनी सादर केला आहे. ज्येष्ठ रंगकर्मी सुधीर चित्ते यांनी या कार्यक्रमासाठी केलेले कवितांचे संकलन हेच या कार्यक्रमाच्या यशाचं मुख्य कारण आहे. या कार्यक्रमाची सुरवात तालुक्यातील ज्येष्ठ साहित्यप्रेमी प्राचार्य डॉ. अशोक निर्बाण आणि आरपीआय (आठवले गट)चे जिल्हाध्यक्ष प्रीतम रूके यांच्या हस्ते झाली. या वेळी कवी कैलास गांधी, सुनील कदम यांच्यासह शिक्षक उमेश मर्चंडे, दिलीप मोहिते, महेश गिम्हवणेकर, आनंद रोहे, हनुमान मोरे, जावेद शेख, उजेर शेख, सायली तांबे, श्रद्धा कोंडविलकर, बसपाचे प्रवीण मर्चंडे आदी उपस्थित होते.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

