माडखोलच्या विकासाचेच धोरण

माडखोलच्या विकासाचेच धोरण

Published on

30069

माडखोलच्या विकासाचेच धोरण

विकास संघटना ः राजकीय दबावाला देणार प्रत्युत्तर

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ७ ः माडखोल येथे गावाबाहेरील व्यक्तींचा वाढता हस्तक्षेप व राजकीय दबाव मोडीत काढण्यासह याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी ‘आपला गाव आपला विकास’ या संकल्पनेतून माडखोल गावविकास संघटनेची स्थापना केली आहे. या संघटनेमध्ये ग्रामपंचायतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह गावातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा समावेश आहे. यापुढे माडखोलच्या विकासाचे आणि नियोजनाचे धोरण माडखोल गावविकास संघटना ठरविणार असल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले.
माडखोल देवस्थानचे प्रमुख मानकरी दत्ताराम राऊळ यांच्या निवासस्थानी नुकतीच बैठक झाली. माडखोल गावविकास संघटनेचे प्रमुख म्हणून दत्ताराम राऊळ, आनंद राऊळ, चंद्रकांत म्हालटकर, राजकुमार राऊळ, संजय राऊळ, माजी सरपंच सूर्यकांत राऊळ, बाबू डिसोझा, चंद्रकांत घाडी यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी सरपंच शृष्णवी राऊळ, उपसरपंच कृष्णा उर्फ जीजी राऊळ, ग्रामपंचायत सदस्य विजय राऊळ, दीप्ती राऊळ, अनिता राऊळ, सरिता राऊळ, प्रज्ञा राणे, जान्हवी पाटील आदी उपस्थित होते.
गावाच्या हिताच्या दृष्टीने या संघटनेसाठी महादेव धुरी, बाबू जाधव, बंड्या म्हालटकर, आनंद म्हालटकर, न्हानू राऊळ, बंटी सावंत, बापू घाडी, संतोष मेस्त्री, रमी मेस्त्री, मंगेश राऊळ, प्रकाश देसाई, मधुकर राऊळ, उल्हास राणे, गुरू सावंत, श्री. चिले, पिन्या ठाकूर, भाऊ तायशेटे, जानू पाटील, नवलू येडगे, बाळा देसाई, राजन नाईक, जीवन केसरकर, बाबा लातये, रोहित गोताड, विश्वास राऊळ, विनोद ठाकूर, सुभाष पालव, प्रकाश राऊळ, गुरू राऊळ, वासुदेव राऊळ, गोपी जाधव, संतोष राणे, पप्पू शेटकर, सुयोग राऊळ, विजय कोठावळे, दाजी राऊळ, पप्पू राऊळ, पप्पू गावडे, संतोष राऊळ, अवी राऊळ, बाबुराव उर्फ आप्पा राऊळ, साईनाथ होडावडेकर, संतोष घाडी, प्रदीप घाडी, अरविंद घाडी, नाना मेस्त्री, विशाल लातये, राजन राऊळ, दाजी खाडये, स्वप्नील राऊळ, बाली म्हालटकर आदींनी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
----
...तर विरोधात संघटना लढणार
माडखोल गावविकास संघटना गावाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणार आहे. शासनाच्या विविध योजनांच्या हक्काचा निधी गावाला देण्यास टाळाटाळ होत असेल तर ही संघटना लोकशाहीच्या मार्गाने लढा उभारून शासनास हा निधी देण्यास भाग पाडणार आहे. जिल्हा नियोजनकडे गावातील विकासकामांचे प्रस्ताव पाठवूनही दबावाच्या राजकारणामुळे फेटाळल्यास त्या विरोधात संघटना लढणार आहे. माडखोल गावातील विविध निर्णय व धोरणांबाबतची गावाबाहेरील व्यक्तीची एकाधिकारशाही मोडीत काढण्यासाठी या संघटनेची स्थापना केल्याचे संघटनेचे प्रमुख राजकुमार राऊळ यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com