राऊळ महाराज महाविद्यालय
प्राचार्यपदी डॉ. स्मिता सुरवसे

राऊळ महाराज महाविद्यालय प्राचार्यपदी डॉ. स्मिता सुरवसे

Published on

30071

राऊळ महाराज महाविद्यालय
प्राचार्यपदी डॉ. स्मिता सुरवसे

कुडाळ, ता. ७ ः येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या नूतन प्राचार्या म्हणून नुकतीच डॉ. स्मिता सुरवसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. सुरवसे मुंबई येथील के.जे. सोमय्या विद्याविहार येथे पदार्थ विज्ञान विभागामध्ये प्राध्यापक तसेच शैक्षणिक विभागाच्या अधिष्ठाता म्हणून कार्यरत होत्या.
त्या मूळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील असून, जिल्हा मलेरिया अधिकारी म्हणून निवृत्त झालेल्या (कै). शांताराम सावंत यांच्या सुकन्या आहेत. अध्यापन कार्यकाळात त्यांनी संशोधन क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यांचे एकूण सात संशोधन प्रकल्प पूर्ण झाले असून आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकांमधून वीसहून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. संशोधन क्षेत्रातील कामगिरीसाठी त्यांना लक्षवेधी प्राध्यापक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. प्राचार्य पदाचा कार्यभार त्यांनी २५ ऑक्टोबरपासून स्वीकारला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील त्या पहिल्या महिला प्राचार्य आहेत. त्यांच्या नियुक्तीबद्दल कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वागत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com