मळगाव भूतनाथ जत्रोत्सव उत्साहात

मळगाव भूतनाथ जत्रोत्सव उत्साहात

Published on

30070

मळगाव भूतनाथ जत्रोत्सव उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ७ ः मळगाव गावचे ग्रामदैवत श्री देव भूतनाथ देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवारी (ता. ६) भक्तिमय वातावरणात झाला. सोनुर्लीप्रमाणेच लोटांगणाची जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या या जत्रेला शेकडो भाविकांनी लोटांगणाचा नवस फेडला.
सावंतवाडी शहरालगत असलेल्या मळगाव घाटीच्या पायथ्याशी स्थानापन्न असलेल्या मळगावचे ग्रामदैवत श्री देव भूतनाथ देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव उत्साहात झाला. त्यानिमित्त सकाळी पूजा व अन्य धार्मिक विधींनंतर दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली. यावेळी दर्शन, विठलादेवीची ओटी भरणे, नवस फेडणे आदी कार्यक्रम उशिरापर्यंत सुरू होते. रात्री उशिरा पालखी परिक्रमा करीत लोटांगणाचा नवस फेडण्यात आला. ढोलताशांच्या गजरात भाविक भक्तांनी लोटांगणे घातली. यावेळी पुरुष व महिला भाविकांनी आपला नवस फेडला. हा सोहळा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाली होती. रात्री उशिरा मळगाव येथील स्थानिक कलाकारांनी दशावतार नाट्यप्रयोग सादर केला. दुसऱ्या दिवशी सकाळी दहिकाल्याने जत्रोत्सवाची सांगता झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com