पाडलोस, न्हावेलीत ‘वायंगणी’ची लगबग

पाडलोस, न्हावेलीत ‘वायंगणी’ची लगबग

Published on

30082

पाडलोस, न्हावेलीत ‘वायंगणी’ची लगबग

कामांना वेग; पोषक हवामानामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ७ ः पाडलोस, न्हावेली भागात वायंगणी भातशेतीच्या कामास गती आली आहे. फेंजल चक्रीवादळाचा काहीसा परिणाम झाल्याने शेतकऱ्यांनी वायंगणी शेतीकडे दुर्लक्ष केले होते; मात्र सध्यस्थितीत शेतीस हवामान पोषक असल्याने वायंगणी शेती करण्याची लगबग दिसून आली.
पावसाळ्यात अतिमुसळधार तर भात कापणीवेळी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. निसर्गाच्या चक्रव्यूहात कायम सापडणारा शेतकरी नुकसानीकडे दुर्लक्ष करत पुन्हा एकदा नव्या जोमाने वायंगणी शेती करण्यास सज्ज झाला आहे. न्हावेली, पाडलोस भागात मोठ्या प्रमाणात वायंगणी भात शेती केली जाते. डिसेंबच्या पहिल्या आठवड्यात वांगणी शेतीला प्रारंभ होतो. मजुरांचा तुटवडा असूनही शेतकरी वांगणी शेती टिकवून आहेत. जमीन पडीक न ठेवता नुकसान झाले तरी शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येतो.
............
कोट
वायंगणी शेतीचे काम सुरू असले तरी खरीप हंगामातील केलेल्या भात पिकाची मळणी सध्या सुरू आहे. काही ठिकाणी जनावरे तर काही ठिकाणी मशीनद्वारे मळणी सुरू आहे. यावर्षी पीक चांगले होते; मात्र अवकाळी पावसामुळे पिकासह गवताचे नुकसान झाले.
- भूषण केणी, शेतकरी
...............
रानटी प्राण्यांपासून शेतीला कायम धोका संभवतो; परंतु याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत असते. शेतीचे संरक्षण करण्यासाठी आम्ही माचोळी तयार करतो. थंडी सुरू झाल्यामुळे शेतीस पोषक वातावरण निर्माण होत आहे.
- एकनाथ नाईक, शेतकरी, पाडलोस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com