कुडाळात जानेवारीत बालरुग्ण शस्त्रकिया
कुडाळात जानेवारीत
बालरुग्ण शस्त्रकिया
कुडाळ ः प्रख्यात शल्यचिकित्सक डॉ. संजय ओक यांनी अधिक व्यापक स्वरूपात लोकांपर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचावी, या उद्देशाने महिला व बाल रुग्णालय कुडाळ येथे २४, २५ व २६ जानेवारी कालावधीत बालरोग शल्यचिकित्सा शिबिरात शस्त्रक्रिया करणार आहेत. मागील सात वर्षांत साधारण १५० लहान मुलांवर सिंधुदुर्गात येऊन त्यांनी विनामूल्य तत्त्वावर शस्त्रक्रिया केली आहे. त्यात त्यांना लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय येथील बालरोग शस्त्रक्रिया विभागप्रमुख डॉ. पारस कोठारी आणि त्यांच्या टीमची बहुमोल साथ लाभली आहे. हर्निया, अपेंडिक्स आदी शस्त्रक्रिया महिला व बाल रुगणालय येथे होणार आहेत. अधिक जटील आजारांवरच्या शस्त्रक्रिया सायन हॉस्पिटल येथे शासनाच्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य तथा प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमार्फत करण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, अशी मागणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, सुशीला गणेश निगुडकर ट्रस्टचे डॉ. संजय निगुडकर, बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे उमेश गाळवणकर व या उपक्रमाचे समन्वयक डॉ. अमेय देसाई यांनी केले आहे.
...........
ओरोसला २० रोजी
आरोग्य शिबिर
मालवण : असरोंडी येथील डॉ. अजित सावंत यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ओरोस येथे २० डिसेंबरला सकाळी ९.३० वाजता युरोलॉजी अर्थात मूत्रपिंड, मूत्राशय व तत्सम अवयवांच्या संबंधित आजारांवर आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. डॉ. सावंत हे मुंबईमधील लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय व सायन हॉस्पिटल येथील युरोलॉजी विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख असून, या शिबिरात त्यांच्यासोबत मुंबई युरोलॉजिकल सोसायटीचे अन्य शैल्यचिकित्सकही सहभागी होणार आहेत. पहिल्या टप्प्यात म्हणजेच २० डिसेंबरला जिल्हाभरातून येणाऱ्या रुग्णांची तपासणी होणार आहे. त्यात गरजू रुग्णांच्या शस्त्रक्रिया, पुढच्या टप्प्यात शासकीय महाविद्यालयातच व गरज भासल्यास सायन हॉस्पिटल येथे शासनाच्या महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य तथा प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमार्फत करण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा जिल्ह्यातील गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक डॉ. सावंत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मनोज जोशी, उपक्रम समन्वयक डॉ. अमेय देसाई यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

