डॉ. आंबेडकरांना देवरुखात अभिवादन

डॉ. आंबेडकरांना देवरुखात अभिवादन

Published on

डॉ. आंबेडकरांना
देवरूखात अभिवादन
साडवली ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या देवरूख पोलिस ठाण्यासमोरील पूर्णाकृती पुतळ्याला संगमेश्वर तालुक्यातील हजारो आंबेडकरी अनुयायांनी, भीमसैनिकांनी, अधिकाऱ्यांनी, राजकीय पदाधिकाऱ्यांनी व विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी जन्मशताब्दी समिती संगमेश्वर (मुंबई) व भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभा घेण्यात आली. या प्रसंगी समितीचे अध्यक्ष वि. ल. मोहिते, कार्याध्यक्ष वाय. जी. पवार, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष राहुल मोहिते, सरचिटणीस ज. भा. कदम, यशवंत जाधव, प्रकाश कांबळे, वंचितचे तालुकाध्यक्ष राजेंद्र मोहिते, आरपीआय आठवले गटाचे तालुकाध्यक्ष विक्रम मोहिते आदी उपस्थितांनी मनोगताद्वारे अभिवादन केले.
----
निकम विद्यालयात
महापरिनिर्वाण दिन
सावर्डे ः महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन येथील गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात साजरा करण्यात आला. प्राचार्य राजेंद्र वारे यांच्या हस्ते डॉ. आंबेडकराच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला. या वेळी राजेंद्र वारे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले,‘ज्याला दुःखातून सुटका हवी असेल त्याला लढावं लागेल आणि ज्याला लढायचे असेल त्याला अगोदर शिकावं लागेल. कारण, ज्ञानाशिवाय लढलात तर पराभव निश्चित आहे तसेच शिक्षक मंगेश दाते यांनी ''शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा, हा डॉ. आंबेडकरांचा संदेश विद्यार्थ्यांना सांगितला. नेहा जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे निवेदन व आभार जयंत काकडे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com