केळकर हायस्कूलमध्ये महापरिनिर्वाण दिन
केळकर हायस्कूलमध्ये
महापरिनिर्वाण दिन
देवगड, ता. ७ : तालुक्यातील वाडा येथील अनंत कृष्ण केळकर हायस्कूलमध्ये महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन व कार्य याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
मुख्याध्यापक सुनील घस्ती यांच्या अध्यक्षतेखाली प्रशालेच्या भिडे सभागृहात कार्यक्रम झाला. व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षक विकास पवार, शाळा समितीचे अध्यक्ष हर्षद जोशी होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून झाली. विद्यार्थ्यांमधून भार्गवी पुजारे, प्रगती मिराशी, सलोनी मुळम, वेदांत देवळेकर, प्रणव वाडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. श्री. घस्ती यांनी डॉ. आंबेडकरांच्या कार्याची माहिती देताना, काळाराम मंदिर प्रवेश, मनुस्मृती दहन व चवदार तळ्याचा सत्याग्रह या प्रसंगांचे महत्त्व सांगितले. संविधानाबाबत माहिती दिली. श्री. जोशी यांनी सर्वांनी संविधानाचे वाचन करून त्यातील बारकावे समजून घ्यावेत. तसेच डॉ. आंबेडकर यांचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा, असे आवाहन केले. प्रशालेचे सहायक शिक्षक भूषण दातार यांनी प्रशाळेला भारताचे संविधान भेट दिले. प्रेम जाधव यांनी सूत्रसंचालन केले. कस्तुरी वारिक या विद्यार्थ्यांनी प्रास्ताविक केले. आर्यन पुरळकर याने आभार मानले. शिक्षक नीलेश तिर्लोटकर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

