माभळे घडशीवाडी शाळा द्वितीय
-rat७p५.jpg-
P२४N३००६५
संगमेश्वर ः माभळे घडशीवाडी शाळा.
---------
माभळे घडशीवाडी शाळा द्वितीय
माझी शाळा, सुंदर शाळा स्पर्धा ; दोन लाखांचे बक्षीस
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ७ ः तालुक्यातील मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन या अभियानात माभळे घडशीवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या शाळेला दोन लाख रुपयांचा निधी बक्षीस म्हणून दिला जाणार आहे.
माभळे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माभळे घडशीवाडी ही शाळा पहिली ते चौथीपर्यंत आहे. या शाळेची पटसंख्या ४१ आहे. अभियानाच्या माध्यमातून शाळेचा प्रभावी विस्तार करण्यासाठी पायाभूत सुविधा, शासन अंमलबजावणी, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता करण्यासोबत शाळेत अद्ययावत तंत्रज्ञानाचा अध्यापनात वापर, विद्यार्थ्यांसाठी वाचनालय, विद्यार्थ्यांसाठी ज्यादा समयदान वर्ग, विविध कार्यानुभवात्मक उपक्रम, महावाचन, इको क्लब फॉर मिशन लाईफ, शिक्षणसप्ताह, आनंददायी शनिवार, स्वच्छता मॉनिटर, कला क्रीडागुणांचा विकास, शासकीय योजनांचा लाभ अशा विविध उद्दिष्टांवर काम करत तालुक्यातून द्वितीय क्रमांक मिळवला आहे. यासाठी संगमेश्वरचे गटशिक्षणाधिकारी प्रदीप पाटील, केंद्रप्रमुख दिलीप जाधव, बीआरसी तज्ञ, शिक्षक यांचे सहकार्य लाभले आहे. अभियानाच्या यशस्वीतेसाठी सरपंच, उपसरपंच, सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नेहा भोसले, सर्व सदस्य, सर्व ग्रामस्थ, पालक, मुख्याध्यापिका श्वेता संसारे व शिक्षक शिवप्रसाद गड्डमवार यांनी विशेष परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

