ः अजित नाचणकर सेवानिवृत्ती

ः अजित नाचणकर सेवानिवृत्ती

Published on

- rat७p१६.jpg-
P२४N३०१२७
रत्नागिरी ः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सरव्यवस्थापक अजित नाचणकर यांचा सत्कार करताना अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे. सोबत अजय चव्हाण, डॉ.सुधीर गिम्हवणेकर व संचालक.

जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक
अजित नाचणकर सेवानिवृत्ती

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ ः रत्नागिरी जिल्हा मध्यवत सहकारी बँकेचे सरव्यवस्थापक अजित नाचणकर हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत. अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या हस्ते नाचणकर यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार करण्यात आला.
नाचणकर यांनी जिल्हा बँकेत ३९ वर्षे सेवा बजावली. १ नोव्हेंबर १९८५ ला लिपिक पदावर ते जिल्हा बँकेत रूजू झाले. पहिली सात वर्षे लिपिक म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतरच्या ३२ वर्षात त्यांनी मंडणगड ते राजापूरपर्यंत जिल्हा बँकेच्या विविध शाखांमध्ये शाखाधिकारी, अन्य विभागात वरिष्ठ अधिकारी म्हणून काम केले. बँकेचे संचालक ॲड. दीपक पटवर्धन, गजानन पाटील, राजेंद्र सुर्वे, डॉ. अनिल जोशी, मधुकर टिळेकर, नेहा माने, दिशा दाभोळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय चव्हाण, डॉ. सुधीर गिम्हवणेकर आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com