सलग तिसऱ्या दिवशी बांद्यात मुसळधार

सलग तिसऱ्या दिवशी बांद्यात मुसळधार

Published on

30132

सलग तिसऱ्या दिवशी बांद्यात मुसळधार

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ७ ः बांदा शहर व परिसराला आज सलग तिसऱ्या दिवशी विजांच्या गडगडाटासह मुसळधार अवकाळी पावसाने झोडपून काढले. तब्बल दोन तास पाऊस कोसळल्याने स्थानिकांसह शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.
आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास विजांचा गडगडाट सुरू झाला. दुपारी २ वाजता मुसळधार अवकाळी पाऊस कोसळण्यास सुरुवात झाली. तब्बल दोन तास पावसाने झोडपून काढले. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. हवामान विभागाने उद्यापर्यंत (ता. ८) अवकाळी पावसाची शक्यता वर्तविल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. बांदा दशक्रोशीतील ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस बरसला. या अवकाळी पावसाचा विपरित परिणाम काजू मोहोरावर होणार आहे. पावसाने काजूला फुटलेला मोहोर कुजण्याची तसेच काळा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे झाडांना आलेला मोहोर टिकविण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com