गवाणकर मित्रपरिवारातर्फे कर्करोगग्रस्त काव्याला मदत
30136
गवाणकर मित्रपरिवारातर्फे
कर्करोगग्रस्त काव्या शेळकेला मदत
कणकवली, ता. ७ : आचरा येथील तीन वर्षांची मुलगी काव्या शेळके ही कर्करोगग्रस्त असून, तिच्यावर गोवा येथे उपचार सुरू आहेत. तिची परिस्थिती खूप गरिबीची असल्यामुळे कुटुंबीयांनी मदतीचे आवाहन केले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत शहरातील गौरव गवाणकर मित्रपरिवारातर्फे ३५ हजार रुपयांची रोख रक्कम तसेच तांदूळ, डाळ, तेल व इतर जीवनावश्यक वस्तूंची मदत देण्यात आली.
गौरव गवाणकर यांच्यासह मिंगेल मंतेरो, महेश नार्वेकर, आनंद पारकर, जय शेट्ये, रवी बाणे, संजय पारकर, भालचंद्र नार्वेकर, आदींनी गोवा येथे शेळके कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी शेळकेंच्या कुटुंबाला रोख रक्कम आणि जीवनावश्यक वस्तू प्रदान केल्या. तसेच काव्याला लवकर बरी होण्यासाठी शुभकामना व्यक्त केल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

