-ठाकरे शिवसेनेत राजीनामास्त्र

-ठाकरे शिवसेनेत राजीनामास्त्र

Published on

रत्नागिरीतील ठाकरे शिवसेनेत राजीनामास्त्र

झिमण आघाडीवर ; पक्ष एकसंध ठेवण्याचे आव्हान

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ ः विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर शिवसेना (ठाकरे) गटात राजीनामास्त्र सुरू झाले आहे. तालुका युवाधिकारी प्रसाद सावंत यांच्या पाठोपाठ डॉ. सुजित झिमण यांनीही पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांच्याकडे सादर केला आहे. मागील आठवड्यात झालेल्या बैठकीत अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्यामुळे ठाकरे शिवसेना एकसंध ठेवण्याचे आव्हान वरिष्ठांपुढे निर्माण झाले आहे.
विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार बाळ माने यांचा उदय सामंत यांनी दारुण पराभव केला. या निकालानंतर उबाठा गटात दुफळी निर्माण झाली आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत त्याचे पडसादही उमटले होते. विधानसभा निवडणुकीनंतर सर्वप्रथम प्रसाद सावंत यांनी युवा तालुका संघटक पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर शिवसैनिक आणि एकेकाळचे माजी आमदार राजन साळवी यांचे निकटवर्तीय डॉ. प्रतीक झिमण यांनी पक्ष सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. मागील २० वर्षे पक्षात कार्यरत असून, वैयक्तीक अडचणीमुळे राजकीय क्षेत्रातून निवृत्ती घेत असल्याचे झिमण यांनी राजीनाम्यात नमूद केले आहे. झिमण यांनी कुवारबाव, कारवांचीवाडीसह आजुबाजूच्या परिसरात लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पक्षाचे चांगले काम केले होते. ते पंचायत समितीसाठी इच्छुक होते; मात्र सध्याच्या राजकीय परिस्थितीला कंटाळून राजकारणामधून बाजूला होण्याचा निर्णय घेत असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com