

-rat७p१७.jpg-
P२४N३०१४३
रत्नागिरी ः थिबा राजवाड्यामध्ये मल्टीमीडिया शो दाखवण्यासाठी उभारण्यात येत असलेली यंत्रणा.
---------
रत्नागिरीतील मल्टीमीडिया शोचे काम अंतिम टप्प्यात
पर्यटनाला चालना; महिन्याभरात काम पूर्ण होण्याची शक्यता
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ ः रत्नागिरी शहराच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी थिबा राजवाडा येथे उभारण्यात येत असलेल्या मल्टीमीडिया शोचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या महिनाभरात त्याचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे.
रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी पालकमंत्री असताना रत्नागिरीत पर्यटनाला चालना देण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले. त्यातील मल्टीमीडिया शो हा एक महत्वाचा उपक्रम आहे. थिबा राजवाडा पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात. सायंकाळनंतर तिथे मल्टीमीडिया शोच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचा काळ, कोकणातील महान व्यक्तींचे महत्व, कोकणचा इतिहास या शोच्या माध्यमातून दाखवला जाणार आहे. मल्टीमीडिया शोचे काम आता अंतिम टप्प्याकडे सरकत आहे. या ठिकाणी साडेतीनशे व्यक्तींची बैठक व्यवस्था केली जाणार आहे. परिसरात बाजूने हिरवळ पसरवण्याचे काम सुरु आहे. मल्टीमीडिया शोसाठी २० कोटी व अन्य कामांसाठी २ कोटी असे २२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. थिबापॅलेस येथील हे काम अंतिम टप्प्याकडे सरकत असून, पुढील महिन्यात हे काम पूर्ण होईल असे नगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
------
किल्ल्यावरील शिवसृष्टीही लवकरच मार्गी
रत्नागिरी शहरात मागील वर्षी थिबापॅलेस बागेत भव्य छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती, माळनाका येथील श्री विठ्ठल मूर्ती, रत्नदुर्ग किल्ल्यावरील शिवसृष्टी आदी उपक्रम हाती घेतले. यातील काही कामे पूर्ण झाली असून, उर्वरित काही अंतिम टप्प्यात आहेत. ती येत्या काही दिवसात पूर्ण होतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.