क्राईम

क्राईम

Published on

सार्वजनिक ठिकाणी मद्य
पिणाऱ्यांवर गुन्हा
रत्नागिरी ः तालुक्यातील मालगुंड येथील सार्वजनिक ठिकाणी मद्य पिणाऱ्यावर जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद अशोक मयेकर (वय ४६) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. ६) सायंकाळी मालगुंड-खारभूमी येथील आडवाबांध मोरीशेजारील बदामाच्या झाडाखाली निदर्शनास आली. या प्रकरणी पोलिसशिपाई नीलेश गुरव यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. दरम्यान रत्नागिरी शहरानजीकच्या काळाबादेवी येथे मद्य पिणाऱ्यावर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष यशवंत मयेकर (वय ५०) असे मद्य प्राशन करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. ६) सकाळी निदर्शनास आली. या प्रकरणी पोलिस हेडकॉन्स्टेबल रूपेश भिसे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
---
अकरा महिन्याच्या
बालिकेचा मृत्यू
रत्नागिरी ः सर्दी, ताप आलेल्या लहानग्या मुलीला उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. श्रीशा सचिन सावंत (वय ११ महिने, रा. भोके, रत्नागिरी) असे मृत मुलीचे नाव आहे. ही घटना २ डिसेंबरला घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रीशाला सर्दी, ताप असल्याने तातडीने तिला उपचारासाठी सीपीआर कोल्हार येथे हलविण्यात आले होते. तिच्यावर उपचार सुरू असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
---
वाहतुकीस अडथळा
करणाऱ्या चालकावर गुन्हा
रत्नागिरी ः लांजा तालुक्यातील वाडगाव फाटा येथे वाहतुकीस अडथळा निर्माण होईल असे वाहन पार्क करणाऱ्या चालकाविरुद्ध लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बापुराव तुळशीराम पाराधे (वय ४९, रा. ब्रह्मपुरी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) असे संशयित चालकाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. ६) सायंकाळी वाडगाव फाटा, लांजा येथे निदर्शनास आली. या प्रकरणी पोलिस हेडकॉन्स्टेबल रहिम मुजावर यांनी लांजा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com