खेड- माणगाव येथे भीषण अपघातात चार गंभीर

खेड- माणगाव येथे भीषण अपघातात चार गंभीर

Published on

-rat7p20.jpg
30163
माणगाव ः अपघातानंतर दोन्ही गाड्यांची झालेली स्थिती.

माणगावमध्ये अपघातात चार जखमी

दोन मोटारींची धडक; महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच

सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ७ : मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव बायपासचे काम रखडल्याने वाहनचालकांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे दिवसागणिक महामार्गावर अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अपघाताची भयावह दृश्ये नेहमीच पाहायला मिळत आहेत. शुक्रवारी (ता. ६) रात्री ११.१५ ते ११.३०च्या दरम्यान दोन मोटारींमध्ये झालेल्या भीषण अपघातात चौघे गंभीर जखमी झाले आहेत.
हा अपघात माणगाव बाजारपेठेलगत एकता पेट्रोलपंपाच्या अलीकडे व मोतिराम प्लाझाच्या समोरील वळणावर घडला. अपघाताची भयावहता इतकी होती की, यामध्ये दोन्ही मोटारींच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. यामध्ये गुहागरवरून मुंबईकडे जाणारी मोटार (एमएच ०१, सीआर ३५५३) व मुंबईकडून खेडकडे जाणारी मोटार (एमएच ०८, एएक्स ६०६८) यांच्यामध्ये हा अपघात झाला. दोन्ही गाड्यांमध्ये चालकांसह प्रत्येकी चार असे एकूण ८ प्रवासी प्रवास करत होते. यामध्ये मुंबईकडून खेडकडे जाणाऱ्या मोटारीत चालक नीलेश जोगळे, प्रवासी महिला अनिता गिल्डा, स्मिता बुटाला, वर्षा चिंडक (सर्व रा. खेड, जि. रत्नागिरी); तर गुहागरकडून मुंबईकडे जाणाऱ्या मोटारीत चालक विकास भागवत, ज्योती भागवत, ऋग्वेद भागवत, चार्वी भागवत (सर्व रा. गुहागर, सध्या रा. मुंबई) अशा ८ जणांचा समावेश आहे. या अपघातात गुहागरकडून मुंबईकडे जाणाऱ्या मोटारीतील चारजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आले आहे. खेड येथील चार प्रवाशांवर माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची घटना समजताच माणगाव शहरातील स्थानिक युवकांनी घटनास्थळी धाव घेतली. माणगाव पोलिस निरीक्षक निवृत्ती बोऱ्‍हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली भारत वामन, यश गालिंदे व गृहरक्षक जवान यांनी स्थानिकांच्या मदतीने अपघातग्रस्तांना घटनास्थळावरून रुग्णालयात दाखल केले. या अपघाताची नोंद माणगाव पोलिस ठाणे येथे करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com