पान एक-चालत्या दुचाकीवर वाघाचा हल्ला
टीपः swt722.jpg मध्ये फोटो आहे.
ओळ -
सावंतवाडी ः वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेले राजेश देसाई यांच्या प्रकृतीची विचारपूस करताना प्रमोद सावंत. शेजारी राजन देसाई, मधुकर देसाई.
धावत्या दुचाकीवर वाघाचा हल्ला
डेगवेतील घटना; ग्रामपंचायत सदस्य जखमी
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ७ ः डेगवे-वराडकरवाडी येथे वाघाने धावत्या दुचाकीवर झडप घातल्याने डेगवे ग्रामपंचायत सदस्य राजेश नारायण देसाई गंभीर जखमी झाले. त्यामध्ये त्यांचा हात फ्रॅक्चर झाला असून त्यांना सावंतवाडी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. दुचाकीवरून पडल्याने त्यांची पत्नी व मुलालादेखील दुखापत झाली. ही घटना शुक्रवारी (ता. ६) रात्री घडली.
देसाई शुक्रवारी रात्री मळगाव येथे जत्रेसाठी जायला डेगवे-मोयझरवाडी येथून पत्नी वर्षा, मुलगा समर्थ यांच्यासह दुचाकीने निघाले. बांदा रस्त्यावर डेगवे-वराडकरवाडी येथे रात्री साडेआठच्या सुमारास आले असता वाघाने झुडपातून येत त्यांच्या दुचाकीवर झडप घातली. त्यामुळे दुचाकी रस्त्यावर उलटली. अचानक हल्ल्याने देसाई कुटुंबीय भांबावले. यावेळी सर्वांनी आरडाओरड केली. त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या दुचाकीस्वारांनीही आरडाओरड केल्याने वाघाने लगतच्या झाडीच्या दिशेने धूम ठोकली.
जखमी देसाई यांना डेगवे सरपंच राजन देसाई, माजी उपसरपंच मधुकर देसाई, चंद्रकांत परब, डिंगणे उपसरपंच संजय नाईक यांनी त्वरित बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यांचा डावा हात फ्रॅक्चर झाला आहे. बांदा वनपाल प्रमोद सावंत यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेत जखमींची विचारपूस केली. आज सकाळी घटनास्थळाचा पंचनामा करत जखमींचे जबाब नोंदविण्यात आले. जखमी देसाई यांच्यावरील उपचाराचा सर्व खर्च वनविभाग करणार आहे, असे सावंत यांनी सांगितले.
डेगवे, तांबोळी, असनिये परिसरात यापूर्वी अनेकांना वाघाचे दर्शन झाले आहे. अनेकांनी वाघाला भरदिवसा मुक्तसंचार करताना बघितले आहे. मात्र, वाघाने चालत्या गाडीवर हल्ला केल्याची ही पहिलीच घटना आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. वनविभाग सतर्क झाला आहे. घटना घडलेल्या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. परिसरात वस्तीदेखील आहे. येथेच वाघाचा वावर वाढल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. यापूर्वी डेगवेच्या जंगलात पट्टेरी वाघाची मादी व दोन बछडे शेतकऱ्यांच्या दृष्टीस पडले होते. त्यामुळे परिसरात वाघाचे अस्तित्व असल्याचे सिद्ध झाले आहे.
सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यांत आठ वाघांचा संचार आहे. सह्याद्रीच्या पट्ट्यात आंबोली ते मांगेलीपर्यंतच्या परिसरात हे वाघ वनविभागाच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. त्यात डेगवे गावही येते. वनविभागाने यात लक्ष घालावे. तसेच राजेश देसाई यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी डेगवेचे माजी सरपंच मधुकर देसाई यांनी केली आहे.
कोट
वाघाच्या हल्ल्यातील जखमी राजेश देसाई यांची प्रकृती स्थिर आहे. हल्ला झालेल्या घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. जखमी देसाई, त्यांची पत्नी व मुलाकडून घटनेची तपशीलवार माहिती घेतली आहे.
- प्रमोद सावंत, वनपाल, बांदा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

