गॅस गळती

गॅस गळती

Published on

30191
रत्नागिरी ः महामार्गावर सीएनजी टँकरमधून वायू गळती झाली.

सीएनजी टँकरमधून गॅस गळती

रत्नागिरीनजीक महामार्गावर खड्ड्यांमुळे प्रकार; अनर्थ टळला

रत्नागिरी, ता. ७ : रत्नागिरी शहराजवळ टीआरपी येथे डीमार्ट समोर राष्ट्रीय महामार्गांवर खड्ड्यांमुळे सीएनजी टँकरमधून मोठ्या प्रमाणात वायू गळती सुरू झाली. यावेळी अचानक झालेल्या मोठ्या आवाजाने परिसरात भीतीचे वातावरण पसरले. हा प्रकार घडल्यानंतर एमआयडीसी आणि नगर परिषद अग्निशमन पथकांनी तातडीने धाव घेतल्याने होणारा मोठा अनर्थ टळला.
दरम्यान, गॅस लिकेजवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात यश आले. या घटनेमुळे सुमारे तासभरापेक्षा जास्त काळ मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास कुवारबावकडून एका खासगी गॅस कंपनीचा टँकर रत्नागिरीच्या दिशेने येत होता. हा टँकर कुवारबाव परिसरातील डीमार्ट समोरील ठिकाणी मुख्य रस्त्यावर आला असता त्यातून गॅस गळती सुरू झाली. खड्ड्यात आपटल्यामुळे मोठ्या प्रमाणात गॅस बाहेर पडत होता. दोन व्हॉल्व्हमधून ही गॅस गळती सुरू झाली होती. त्यामुळे इतर वाहनधारकांची तारांबळ उडाली.
या गॅस गळतीवर नियंत्रण राखण्यासाठी व अनर्थ टाळण्यासाठी तातडीने अग्निशमन पथकांना बोलावण्यात आले. पोलिस यंत्रणाही दाखल झाली. घडल्या प्रसंगाने या मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली. एमआयडीसी अग्निशमन पथक अधिकारी सुरेश गोल्लार व ६ जणांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच नगर पालिका अग्निशमन पथकातील नरेंद्र मोहिते, शिवम शिवलकर, सलीम चांदावाले, यश वालम, पोलिस दल कर्मचारी संतोष गायकवाड, लक्ष्मण कोकरे हे देखील घटनास्थळी धावले. गॅसवाहू टँकरमधून गळती होणारा गॅस थांबविण्यासाठी तत्काळ प्रयत्न हाती घेण्यात आले. त्या गळतीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

--------
चौकट
महामार्गांवर वाहतूक कोंडी
सायंकाळी मुख्य महामार्गांवर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू होती. हा प्रकार घडल्यानंतर वाहतूक थांबवण्यात आली. त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com