सावंतवाडीत २४ ला कथाकथन स्पर्धा
सावंतवाडीत २४ ला
कथाकथन स्पर्धा
सावंतवाडी ः येथील श्रीराम वाचन मंदिर संस्था आयोजित २४ डिसेंबरला सकाळी १० वाजता साने गुरुजी जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘द. कृ. वाडकर कृतज्ञता निधी’ कथाकथन स्पर्धा आयोजित केली आहे. यंदाचे हे २९ वे वर्ष आहे. सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ समाजवादी नेते (कै.) दत्ताराम वाडकर यांनी संस्थेकडे कायमस्वरूपी ठेवलेल्या रोख रकमेच्या व्याजातून ही स्पर्धा आयोजित केली जाते. तालुक्यातील पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी अशा विद्यार्थ्यांसाठी दोन गटांत घेतली जाणार आहे. पहिल्या गटासाठी अनुक्रमे २५०, २०० व १५० रुपये, तर दुसऱ्या गटासाठी ३००, २५० व २०० रुपये अशी पारितोषिके आहेत. तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांनाही या स्पर्धेत सहभाग घेता येणार आहे. स्पर्धेसाठी कोणत्याही संस्कारक्षम कथेची निवड करावी. स्पर्धकाला पाच मिनिटे वेळ दिला जाणार आहे. प्रत्येक शाळेतून प्रत्येक गटातून दोनच स्पर्धक विद्यार्थ्यांना भाग घेता येणार आहे. स्पर्धा संपल्यानंतर पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष अॅड. संदीप निंबाळकर व कार्यवाह रमेश बोंद्रे यांनी केले आहे.
--
तळगावात ‘कृषी’तर्फे
भातशेती मार्गदर्शन
मालवण ः जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधून तळगाव येथे मालवण कृषी विभागाकडून ‘किसान गप्पागोष्टी’ कार्यक्रम आणि आंबा, काजू आणि भातशेती मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव, उपविभागीय अधिकारी पाटील, कृषी सहायक अमृता भोगले, कृषी पर्यवेक्षक कुबल, तळगाव सरपंच खोत यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. यावेळी आंबा व्यापारी डॉ. उत्तम फोंडेकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
---
निवृत्त कर्मचाऱ्यांची
सावंतवाडीत आज सभा
सावंतवाडी ः सावंतवाडी-दोडामार्ग तालुके निवृत्त कर्मचारी संघटनेची मासिक सभा उद्या (ता. १०) सकाळी १०.३० वाजता संघटनेच्या सावंतवाडी-सालईवाडा येथील कार्यालयात आयोजित केली आहे. सभेला संघटनेच्या कार्यकारिणी संचालक, सर्व सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष पणदूरकर व सचिव कांबळे यांनी केले आहे.
----
तेंडोली-भोमवाडीत
उद्या गीता जयंती
कुडाळ ः तेंडोली-भोमवाडी येथील अनंत देसाई यांच्या निवासस्थानाकडे मोक्षदा एकादशी व गीता जयंतीनिमित्त बुधवारी (ता. ११) सायंकाळी ६ वाजता प्रवचनकार व कीर्तनकार मकरंद बुवा सुमंत-रामदासी (पुणे) यांचे प्रवचन होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.