-माखजन बसस्थानकाचा होणार कायापालट

-माखजन बसस्थानकाचा होणार कायापालट

Published on

-ratchl१०२.jpg-
P२४N३०७५७
चिपळूण ः माखजन बसस्थानकाचे सुरू झालेले काम.
------------
माखजन बसस्थानकाचा होणार कायापालट

कामाला सुरवात : एक कोटीचा निधी मंजूर
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ११ ः संगमेश्वर तालुक्यातील माखजन बसस्थानकाचे स्वरूप आता पूर्णपणे बदलणार आहे. बसस्थानक परिसरातील खराब झालेले आवार, खड्डे आणि चिखलाच्या समस्यांमुळे प्रवासी, ग्रामस्थ आणि एसटी कर्मचाऱ्यांना होणारा त्रास अखेर संपण्याच्या मार्गावर आहे. आमदार निकम यांच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या फंडातून एक कोटीचा निधी मंजूर केला आहे.
माखजन येथील बसस्थानकाची बिकट अवस्था झाली होती. त्यामुळे माखजन ग्रामस्थांनी ही समस्या आमदार शेखर निकम यांच्यापर्यंत पोहोचवली. त्यानुसार आमदार निकम यांनी पाठपुरावा केला. सामंत यांनी कामाची दखल घेत एमआयडीसीच्या फंडातून एक कोटीचा निधी मंजूर केला. त्यानुसार या निधीतून बसस्थानकाचे सुशोभीकरण सुरू झाले आहे. बसस्थानक परिसरात दर्जेदार दुरुस्ती आणि आधुनिक सुविधांची उभारणी केली जात आहे. यामुळे स्थानकाचा कायापालट होणार आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com