इनपुट कर सवलतीबाबत सीए शाखेतर्फे सेमिनार

इनपुट कर सवलतीबाबत सीए शाखेतर्फे सेमिनार

Published on

-rat१०p४६.jpg-
P२४N३०७५४
रत्नागिरी : बोलताना सीए चैतन्य वैद्य. दुसऱ्या छायाचित्रात उपस्थित अध्यक्ष सीए अभिलाषा मुळ्ये, सीए शैलेश हळबे, सीए आनंद पंडित आदी. दुसऱ्या छायाचित्रात उपस्थित मान्यवर.
--------
‘इनपुट कर’ सवलतीतील ताळमेळ गुंतागुंतीचा

चैतन्य वैद्य ः सीए इन्स्टिट्यूटतर्फे परिसंवाद
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ : इनपुट कर सवलतीच्या (ITC) ताळमेळ प्रक्रियेत दिवसेंदिवस वाढणारी गुंतागूंत आणि जीएसटीएन पोर्टलवर होणारे सतत बदल यामुळे ही प्रक्रिया अधिक कठीण बनत आहे. या बदलांबद्दल जागरूक राहणे अत्यंत महत्वाचे असून त्यामुळेच अशा परिसंवादाचे महत्व अधिक वाढते, असे प्रतिपादन सीए चैतन्य वैद्य यांनी केले.
हॉटेल विवा एक्झिक्युटीव्ह येथे सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे जीएसटीआर- ९ व ९ सी या अत्यंत महत्वाच्या विषयावर आयोजित परिसंवादामध्ये ते बोलत होते. रत्नागिरी शाखेच्या अध्यक्षा सीए अभिलाषा मुळ्ये यांनी वक्त्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले. सदस्यांनी सीए इन्स्टिट्यूट रत्नागिरी शाखेच्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. सत्राध्यक्ष म्हणून सीए आनंद पंडित यांनी काम पाहिले व मनोगतामध्ये सीए चैतन्य यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमावेळी शाखेचे उपाध्यक्ष शैलेश हळबे, कमिटी सदस्य, सीए व कर सल्लागार उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com