आर्ट इंडिया राईडकार डंबे दाम्पत्याचे भारतभ्रमण पूर्ण
-rat१०p२७.jpg -
२४N३०६५२
म्हाप्रळ : वर्षा व सम्राट डंबे यांचा स्वागत सत्कार करताना कार्यक्रमास उपस्थित मान्यवर.
-----------
‘आर्ट इंडिया राईडकार’ डंबे दाम्पत्याचे भारतभ्रमण पूर्ण
वर्षा आणि सम्राट डंबे ; ७९ दिवसांत १५ हजार किमीचा मोटारसायकल प्रवास
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ११ ः आर्ट इंडिया राईडच्या शीर्षकाखाली दुचाकीवरून ७९ दिवस व १५ हजार किलोमीटर इतके अंतर कापून भारतभ्रमण पूर्ण केलेले वर्षा व सम्राट डंबे म्हाप्रळ येथे मुळगावी परत आले आहेत. तालुक्यातील पन्हळी फाटा येथे ग्रामस्थांनी त्या दोघांचे स्वागत केले.
मंडणगड तालुक्यात त्यांचे आगमन झाल्यानंतर गावातील दुचाकीस्वारांनी रॅली काढून दोघांना जाहीर कार्यक्रमाच्या ठिकाणी आणले. त्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते त्या दोघांचा सत्कार करण्यात आला. सम्राट आणि वर्षा यांची आर्ट इंडिया राईड ही साहसी, देशभक्ती आणि सांस्कृतिक शोधाची भावना व्यक्त करणारी एक अविश्वसनीय ठरली. या दोघांनीही आपल्या प्रवासाचे वर्णन केले. ७९ दिवसांची, १५ हजार किमीची ओडिसी भारताच्या सीमांचा शोध घेणारी, तिची विविधता साजरी करणारी आणि राष्ट्रीय एकात्मतेला प्रोत्साहन देणारी ठरली आहे. २० सप्टेंबरला सुरू झालेला प्रवास ८ डिसेंबरला संपला. हा प्रवास सम्राट आणि वर्षा या दोघांना भारताच्या वैविध्यपूर्ण संस्कृती आणि सीमावर्ती प्रदेशातून घेऊन गेला आहे. या राईडमुळे त्यांना केवळ देशाचे नैसर्गिक सौंदर्यच पाहायला मिळाले नाही तर तेथील लोकांची लवचिकता आणि उबदारपणाही पाहायला मिळाला. आर्ट इंडिया राईडचा प्रवास त्यांच्या विश्वासू बाईक, बेनेली ट्रकवरून पूर्ण केला.
मंडणगड येथे झालेल्या स्वागत कार्यक्रमात डॉ. उल्हास डंबे, डॉ. प्रभाकर भावठाणकर, डॉ. दाभाडकर, डॉ. आशिष जाधव, डॉ. पराग वैशंपायन, डॉ. सुहास पवार, मुझफ्फर मुकादम, समंद मांडलेकर, मुश्तकीम कारवीणकर, अहमद मुकादम, निखिल पिंपळे, डंबे कुटुंबीय व म्हाप्रळ येथील ग्रामस्थ उपस्थित होते. विविध सामाजिक संस्था, संघटना यांच्यावतीने प्रवास करणाऱ्या दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला.
---
खानपान, संस्कृती अनुभवली
भारतभ्रमण करत असल्याचे कळल्यावर देशातील कानाकोपऱ्यातून मिळालेल्या आदरामुळे आम्ही भारावून गेलो. आपला देश जगात सर्वात सुरक्षित आहे. प्रांताप्रातांतील खानपान, संस्कृती, तेथील वातावरण आणि त्या त्या भागातील माणसांकडून मिळालेल्या आदरातिथ्य व प्रेमामुळे आम्ही भारावलो. भारतामधील विविध प्रांतातील आदरातिथ्याच्या अनुभतीमुळे आमचा ऊर भरून आल्याचे दोघांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

