मुंबई विद्यापीठ खो-खो संघ प्रशिक्षिकपदी पंकज चवंडे

मुंबई विद्यापीठ खो-खो संघ प्रशिक्षिकपदी पंकज चवंडे

Published on

- rat१०p४०.jpg-
२४N३०६९६
पंकज चवंडे
- rat१०p४१.jpg-
२४N३०७१२
पायल पवार
- rat१०p४२.jpg-
२४N३०७१३
श्रेया सनगरे
- rat१०p४३.jpg-
P२४N३०७१४
साक्षी डाफळे
-------------
खो-खो संघ प्रशिक्षिकपदी पंकज चवंडे

रत्नागिरीला प्रथमच संधी ; ‘गोगटे’च्या ३ खेळाडूंचीही निवड
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ ः पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ खो-खो स्पर्धेसाठी मुंबई विद्यापिठाच्या मुलींच्या खो-खो संघाच्या प्रशिक्षिकपदी रत्नागिरीतील राष्ट्रीय प्रशिक्षक पंकज चवंडे यांची निवड झाली आहे तसेच विद्यापिठाच्या संघात रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या तिघींचा समावेश आहे.
राजस्थान बनसरा येथे १६ ते १९ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ खो-खो स्पर्धेत मुंबई विद्यापिठाचा मुलींचा संघ सहभागी होणार आहे. त्या संघाच्या प्रशिक्षकपदी रत्नागिरीतील चवंडे यांची निवड झाली आहे. चवंडे यांनी यापूर्वी महाराष्ट्र खो-खो मुली संघाचे प्रशिक्षकपद भूषवताना सुवर्णपदक मिळवून दिले आहे. त्यामध्ये तीनवेळा महिला संघ, दोनवेळा ज्युनिअर संघाचे तर दोन खेलो इंडिया स्पर्धेत प्रशिक्षक म्हणून त्यांनी भूमिका बजावली आहे. राष्ट्रीय स्पर्धेतील त्यांच्या अनुभवामुळे त्यांची मुंबई विद्यापीठाच्या मुलींच्या संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. मुंबई येथे १३ डिसेंबरपासून मार्गदर्शन शिबिर होणार असून, त्यानंतर ते राजस्थानला रवाना होणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जाणाऱ्या विद्यापिठाच्या या संघात रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय खो-खोपटू पायल पवार, श्रेया सनगरे व साक्षी डाफळे यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com